पुणे- बंगलोर महामार्गावरील ‘हे’ दोन उड्डाणपूल होणार जमीनदोस्त : काय आहे प्रशासनाचा प्लॅन ते पहा

Karad Kolhapur Naka

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  पुणे- बंगलोर महामार्गावरील दोन उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका आणि कृष्णा हाॅस्पीटलसमोर असलेले उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी संबधित कंपनीकडून सुरू आहे. एक नव्हे तर दोन उड्डाणपूल पाडण्याचा प्लॅन ठरला असून यासाठीच मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. परंतु येत्या 15 ते 20 दिवसात पूल पाडण्याच्या कामास सुरूवात होणार आहे. … Read more

दिव्यांग बांधवाचा निधी खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दिव्यांग बांधवांना शासनस्तरावरून मिळणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी 5% टक्के निधीस जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग सर्वे करण्याच्या कारणास्तव स्थगिती आदेश दिल्याने दिव्यांग बांधवांच्या हक्कावर गदा आली होती. यामुळे सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी हवालदिल होऊन न्याय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांचेकडे धाव घेतली व कैफियत मांडली. सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा … Read more

कोरेगाव तालुक्यातील दारू अड्डा उध्दवस्त : महिलांनी एकाला चोपले

Liquor den raid Koregaon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी- भाडळे येथील चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूच्या अड्डा सायंकाळी चिलेवाडी येथील रणरागिनींनी उद्ध्वस्त केला. यावेळी दारू अड्डा चालविण्याऱ्यास चांगला चोपही दिला. तसेच शेडमधील सर्व साहित्य व बाटल्या फोडून टाकल्या. चिलेवाडी- भाडळे चौक मध्यवर्ती आहे. वर्दळीच्या या चौकापासून भाडळे, चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी, बोधेवाडी (भाडळे), धनगरवाडी आदी … Read more

तांबवे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत बसविले ‘प्लेव्हर ब्लाॅक’

Zilla Parishad School

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढ चांगली झाली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून अनेक विद्यार्थी आज जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल झाले आहेत, असे प्रतिपादन केंद्र प्रमुख निवास पवार यांनी केले. तांबवे जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, तांबवे ग्रामपंचायतीचे वतीने 15 व्या वित्त आयोग निधीतून बसवण्यात आलेल्या प्लेव्हर ब्लाॅकचे व वर्ग … Read more

महिलेला कॉन्फरन्स कॉलवर घेवून मित्राला विनयभंगाची धमकी : खंडणीचा गुन्हा

Satara Police City

सातारा | न्यायालयीन एका प्रकरणात जामिनासाठी मदत केल्याच्या सांगत वारंवार पैशांची मागणी करणे व न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्यावर शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक केली. महेश शंकर लवंगारे (वय- 26, रा. दौलतनगर, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार राजरतन सोरटे (वय- 25, मूळ रा. नातेपुते, ता. माळशिरस, … Read more

कराड- चिपळूण राष्ट्रीय महामार्गातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : शंभूराज देसाई

Karad-Chiplun National Highway

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मुंबई येथे मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती व प्रलंबित कामाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्य अभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता धनंजय … Read more

चक्क! जनावरे बांधली ग्रामपंचायतीच्या दारात : गायरान जागेतील अतिक्रमण हटविले

Wing Gram Panchayat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विंग येथील गायरान जागेतील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा मारला. दोन जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने पाच तासाच्या कारवाईत अतिक्रमणे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे संतप्त अतिक्रमण धारकांनी जनावरे चक्क ग्रामपंचायतीच्या दारात बांधली. त्यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. विंग येथील गावठाणात नऊ हेक्‍टर 58 आर जागेत गायरान आहे. यामध्ये काही ग्रामस्थांनी अतिक्रमणे केल्याचे … Read more

पाटणला शुक्रवारी एक दिवसीय ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलन

Patan Bhadakbaba

पाटण | स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी पाटणमध्ये एक दिवसीय सातवे ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ पाटण व पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी, रसिक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख संयोजक विक्रमबाबा पाटणकर यांनी केले आहे. येथील स्वातंत्र्य सैनिक भाई भडकबाबानगर … Read more

शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा : ज्ञानेश्वर खिलारी

Chhatrapati Shivaji Maharaj Pratapgad statue

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे जिल्हा परिषदेमार्फत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येतो. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा, अशा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या. जिल्हा परिषद ठराव समितीची सभा स्थायी समिती सभागृहामध्ये ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, … Read more

पाटणच्या धारेश्वर मठाला मिळाले 14 वर्षाचे नवे शिवाचार्य

Patan's Dhareshwar Mutt

कराड | महाराष्ट्रासह अनेक राज्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धारेश्वर मठाला नवे शिवाचार्य जाहीर करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धारेश्वर मठाचे नूतन उत्तराधिकारी म्हणून आदीराज शिवाचार्य यांचे नाव जाहीर करण्यात आले. पाटण तालुक्यातील धारेश्वर मठ येथे हजारो भाविकांच्या साक्षीने हा धार्मिक सोहळा मंगळवारी (दि. 31 जानेवारी) पार पडला. आदीराज शिवाचार्य हे 14 वर्षाचे असून 18 … Read more