अजित दादा शब्दाचे पक्के : सातारा जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 13 रूग्णवाहिका दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे. यासाठी राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी 13 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते, उद्या रूग्णवाहिका येतील आणि आज रूग्णवाहिका जिल्ह्याला मिळाल्याने अजित दादांनी दिलेला शब्द पाळला आहे. … Read more

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ : सातारा जिल्ह्यात वर्षभरात 4 कोटी 38 लाखांचा व्याज परतावा 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातारा जिल्हयातील लाभार्थ्यांच्या मागे लाँकडाऊन मध्ये ही खंबीरपणे उभे असून गत एका वर्षात 4 कोटी 38 लाख व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आतापर्यंत 1 हजार 554 लाभार्थ्यांना 120 कोटी 34 लाख रुपयांच कर्ज वाटप व लाभार्थ्यांना एकूण 6 कोटी 38 लाख रुपयांचा … Read more

प्रशासन हतबल पाॅझिटीव्ह रेट कमी होईना : सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 257 बाधित तर 30 मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 257 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 53 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 24 हजार 76 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

धक्कादायक प्रकार : कोरोना बाधित महिलेचे गंठण कराड हाॅस्पीलमधून चोरीस

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील कराड हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण चोरीस गेल्याची तक्रार कराड शहर पोलिसांत दिली आहे. महेश आनंदराव पाटील (रा. सोनकिरे ता. कडेगांव जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिासांनी दिलेली माहीती अशी, कराड हाॅस्पीटल येथे १८ मे रोजी महेश पाटील यांच्या आई इंदुताई आनंदराव पाटील … Read more

महाराष्ट्रातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लसीकरणांची जबाबदारी राज्य सरकारची : अजित पवार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशातील 45 वर्षावरील नागरिकांची लसीकरण करण्याची जबाबदारी ही केंद्राने उचलेली आहे. तर 18 ते 44 वयोगटातील तरूणांची व नागरिकांची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य सरकारने उचलली आहे, असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, आपल्या येथे दोन … Read more

साताऱ्यात उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पत्रकारांच्यात खडाजंगी

Shmaburaj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अजित पवारांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पत्रकारांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पारनेरचे आमदार निलेश लंके याच्या कामाची पध्दत अत्यंत चांगली आहे. तर सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे कामाचा आढावा घ्यावा, अशी मागणी पत्रकारांनी केल्याने वाद झाला. सातारा जिल्ह्यात एक, दोन लोकप्रतिनधी सोडले तर कोणीही काम केले नसल्याचे पत्रकारांनी सांगितले, … Read more

गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची हयगय नाही, जिल्हा प्रशासनावर उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रशासनातील याच अधिकाऱ्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे. त्यामुळे आता सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे पालन केले नाही तर त्यांची हयगय केली जाणार नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सातारा येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : इंद्रजित मोहिते, जगदीश जगताप यांच्यासह आज 84 अर्ज दाखल

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते आणि विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह 84 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आजवर 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर 56 अर्जाची विक्री झाली आहे. आज शुक्रवारी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह सोनसळ येथील रघुनाथ कदम यांच्यासह … Read more

धक्कादायक : सातारा जिल्हा रूग्णालयात कोरोनाची चाचणी केलेली नसताना बोगस अहवाल दिल्याचे उघडकीस

crime

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाची RTPCR चाचणी केलेली नसताना देखील 5 जणांनी जवळ खोटे बोगस अहवाल आढळून आले आहेत. सातारा जिल्हा रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. सध्या कडक लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाहेर जाण्यासाठी तसेच विविध कामासाठी कोरोनाची टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र … Read more

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना सातार्‍यात अन् तुम्ही बुके घेऊन आलाय? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापले (Video)

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात सर्वात जास्त कोरोना साताऱ्यात आहे. त्याच्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मी आलो तर तुम्ही बुके घेऊन येता. तुमचे आमच्यावर, साहेबांच्यावर आणि राष्ट्रवादीवर प्रेम आहे. त्याबद्दल दुमत नाही, आपण नियम पाळा बाबानों असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले. सातारा येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीसाठी आलेले … Read more