ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; या नेत्याला सर्वात महत्वाचं खातं

नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इत्तर कुणाकडे जाण्याचा पायंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना गृह आणि नगरविकास खाते देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदेंकडून गृह खाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. 

म्हणून शिवसेनेनं केला सभा त्याग; राऊतांचे स्पष्टीकरण

व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार हा प्रयत्न करत आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत.

शिवसेनेने विचार करून राज्यसभेत मतदान करावं- कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानंतर राज्यात सत्तेत सहभागी काँग्रेसने काहीसा नाराजीचा सूर लगावला आहे. यागोष्टीला नमूद करताना राज्याचे कॅबिनेट मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला मोलाचा सल्ला देणारी प्रतिक्रिया माध्यमांत दिली आहे.

..तर शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल- संजय राऊत

‘आमच्या पक्षाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना केलं. ‘या विधेयकासंबंधी आमच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर कारण्यासंदर्भांत समाधानकारक ऊत्तरे नाही मिळाल्यास आम्ही राज्यसभेत थेट लोकसभेत घेतलेल्या भूमिके विरुद्ध भूमिका घेऊ’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिले.

हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करू नका; राऊतांचा भाजपवर निशाणा

व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; चर्चेसाठी सहा तासांचा अवधी

राज्यसभेत बहुमत नसले तरी हे विधेयक मंजूर होईल असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त होत आहे. तसेच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार असली तरी भाजपाला मात्र हे विधेयक राज्यसभेत पारित होईल अशी आशा आहे.

‘नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही’; खडसेंना काँग्रेसची ऑफर

नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अहवेलना झालेली आम्हाला देखील आवडलं नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसं पक्षात अली तर आनंदच होईल,

‘मी स्वप्नात बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार’; राऊतांच्या दिलखुलास गप्पा

पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का?

राजकारणात कोणी कोणाला भेटावे यावर बंदी नाही,खडसेंच्या भेटीबाबत शिंदेंचे सूचक विधान

‘राजकारणात कोणीही कोणालाही भेटु शकतो. कोणी कोणाला भेटावे, यावर बंदी नाही’ असे विधान राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आले होते. राज्यात भाजपामधील नाराज नेत्यांचे भेटीगाठीतून भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत.

आता भाजपातून मेगा एग्जिट…?

निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. परंतु आता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.