अबब..!! प्रदीप शर्मांच्या पत्नीची मालमत्ता तब्बल २४ कोटी

गेल्या ३५ वर्षांच्या सेवेत जवळपास पावणे दोन कोटींची मालमत्ता जमवल्याची माहिती शर्मा यांनी उमेदवार प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मात्र, शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती यांची मालमत्ता तब्बल २४ कोटींच्या घरात आहे.

काय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ??

देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.

चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

मित्रपक्षांचा गेम करत भाजपने बळकावल्या परभणीतील २ जागा; ४ मतदारसंघात ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

कराड उत्तरमध्ये महायुतीला बंडाचं ग्रहण; माघार कोण घेणार – मनोज घोरपडे की धैर्यशील कदम ?

कराड उत्तर विधानसभा क्षेत्रात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला जनाधार नसून येथील खरी लढत मनोज घोरपडे विरुद्ध बाळासाहेब पाटील अशीच होईल असा अंदाज नागरिकांनीही व्यक्त केला आहे.

संजय दीना पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणुक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र, आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सत्र कायम रहिले. राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. निवडणुक जाहीर होण्याआधी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर, रश्मी बागल, जयदत्त क्षीरसागर अशा नेत्यांनी खांद्यावर भगवा … Read more