मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । या देशामध्ये काँग्रेसने ७० वर्ष राज्य केले तरीही देशाचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. काँग्रेसची कधी राष्ट्रवादी काँग्रेस झाली तर कधी चड्डी काँग्रेस झाली, कधी रेड्डी काँग्रेस झाली तर कधी समाजवादी काँग्रेस झाली. एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे बोलतो ते करून दाखवितो असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी धामणगाव रेल्वे येथील जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केलं.

धामणगाव रेल्वे मतदार संघाचे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारासाठी रविवारी गडकरी यांच्या विशाल जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. गडकरी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी गडकरींनी विरोधकांच्या भाषणाची टिंगलही उडविली. आजही विदर्भात सिंचनाच्या सोयी ज्या प्रमाणात उपलब्ध पाहिजेत त्या प्रमाणात नाहीत. अमरावती जिल्ह्यात सिंचनासाठी मी तीन हजार कोटी रुपये दिले तर रस्त्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेजही मी मंजूर करून दिल्याचं गडकरी पुढे म्हणाले. विकासाच्या यात्रेत सहभागी व्हायचे असेल तर प्रताप अडसड यांना बहुमताने विजयी करा असे आवाहनही गडकरी यांनी उपस्थितांना यावेळी केले.

Leave a Comment