ठाकरे सरकारमुळेच मुंबई आज ICU मध्ये – राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठाकरे सरकारमुळेच मुंबई आयसीयू मध्ये गेली असल्याचे ट्विट केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात सुरु झाल्यापासून हे टीकास्त्र सुरु आहे. सातत्याने ठाकरे सरकार या संकटकाळात उपाययोजना राबविण्यात तसेच राज्याला सुरक्षित करण्यात अपयशी ठरल्याचे राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे. … Read more

भारत, चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु; भारतीय लष्करी प्रवक्ते म्हणतात…

वृत्तसंस्था | भारत आणि चीनचे अधिकारी सद्यस्थीतीत सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी प्रस्थापित मुत्सद्दी, लष्करी माध्यमांद्वारे काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती ही अनुमानाच्या आधारे अथवा ठोस पुराव्यांशिवाय माध्यमांमध्ये देणे हे उपयुक्त नाही असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी म्हंटले आहे. त्यांनी माध्यमांना अशा प्रकारच्या वृत्तांकनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) … Read more

पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या हस्तकांनी भारतीय डिप्लोमॅट गौरव अहलुवालिया यांच्या गाडीचा पाठलाग केला, व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय डिप्लोमॅट गौरव अहलुवालिया यांना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत. गौरव अहलुवालिया यांच्या घराबाहेर आयएसआयने मोठ्या संख्येने मोटारी आणि बाईकवर लोकांना एकत्र केले, गौरव यांनी घर सोडताच अनेकांनी त्यांचा पाठलाग केला. #WATCH Islamabad: Vehicle of India’s Chargé d’affaires Gaurav … Read more

राज्य सरकारला ९ हजार कोटींचे कर्ज काढण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात संचारबंदी आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे हा संपूर्ण महिना राज्याचे उत्पन्न ९०% नी घसरले आहे. राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. चव्हाण यांनी राज्यातील उत्पन्नाची एकूण … Read more

खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, हॉटेल सुरु पण ‘या’ सूचनांचे पालन करावेच लागेल

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी कामकाजाबाबत एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गर्भवती महिला, 65 वर्षांवरील लोक आणि ज्यांना आधीच गंभीर आजार आहेत अशा लोकांनी कामावर जाणे टाळले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. सोबतच कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, सफाई, सॅनिटायझेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये थुंकण्यावर पूर्णपणे बंदी … Read more

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात … Read more

कोरोनाचा आणखी एक बळी;’या’ प्रसिद्ध अमेरिकन गायकाचा उपचारादरम्यान मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. या कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. अशा या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत सर्वसामान्यां बरोबरच अनेक सेलिब्रिटींना देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायक ख्रिस ट्रोसडेल याचा नुकताच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. … Read more

आपल्या कारकिर्दीतच राम मंदिर निर्माण होवो; संजय राऊतांच्या योगी आदित्यनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज ४८ वा वाढदिवस आहे. ४२ व्या वर्षापर्यँत सलग ५ वेळा खासदार बनण्यासोबतच वयाच्या २६ व्या वर्षी प्रथम खासदार झालेल्या योगीजींना सर्वात कमी वयात खासदार झाल्याचा सन्मान ही मिळाला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आपल्या ट्विटर … Read more

दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा; पुजाऱ्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी सुरु झाली आहे. यामध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची तसेच नागरिकांना येथे प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ८ जूनपासून बहुतांश राज्यातील मंदिरे नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र नागरिकांना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक … Read more

केरळातील हत्तीणीच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; स्फोटकं भरलेला अननस शेतकर्‍यांनी चारलाच नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये स्फोटकांनी भरलेला अननस गर्भवती हत्तीणीला खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती. यावरून देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या घटनेबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी ट्विटवरुन एक पोस्ट शेयर करुन काही गोष्टींचा खूलासा केला आहे. स्फोटकांनी भरलेला अननस शेतकऱ्यांनी हत्तीणीला जाणीवपूर्वक चारलाच नाही … Read more