माझ्या विरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा ; सुप्रिया सुळेंचे सरकारला ओपन चॅलेंज

सोलापूर प्रतिनिधी |  सरकार सूड बुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी , सीबीआय आणि अँटी करप्शनच्या कारवाह्या करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील बरेचशे लोक भाजपमध्ये दाखल होत आहेत. एकीकडे ईडीच्या कारवाहीची नेत्यांमध्ये दहशत असतानाच सुप्रिया सुळे यांनी मात्र माझ्या विरोधात ईडीची नोटीस सरकारने काढून दाखवावी असे ओपन चॅलेंज दिले आहे. जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर … Read more

या तारखेला राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक करणार भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय महाडिक १ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांच्या हस्ते प्रवेश घेतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. २०१४ साली … Read more

गावात फिरते बैलगाडी, लावते वाचनाची गोडी

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यात जेमतेम साडेचार हजार लोकसंख्या असलेल दर्गनहळ्ळी हे गाव. याच गावात राहणारा काशीराज कोळी हा तीस वर्षीय युवक वाचन संस्कृती वाढावी यासाठी झपाटून उठला आहे. भिलार गावापासून प्रेरणा घेत काशीराजने गावात बैलगाडीच्या माध्यमातून चालते-फिरते वाचनालय सुरू केले आहे. गावात दर रविवारी सकाळी बैलगाडीत फिरते वाचनालय … Read more

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

सोलापूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतरणाचा फटका बसतोय तसाच फटका आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पकड मजबूत करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला बसण्याची शक्यता. कारण वंचित आघाडीतील वरच्या फळीतील नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे पक्षांतरणाच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार … Read more

‘टिक-टॉक’ फेम आकाशने केली आत्महत्या

प्रतिनिधी सोलापूर| टिक-टॉक च्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या असणाऱ्या आकाश जाधव (वय 27, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याने रेल्वे खाली आत्महत्या केली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. आकाश जाधव हा कार ड्रायव्हर म्हणून काम करत होता. टिकटॉक अँपवर आपल्या अभिनयाचे व्हिडीओ करून टिक-टॉक फेम अशी प्रसिद्धी आकाशने मिळवली होती. त्याला चाहणारे मोठ्या संख्येने … Read more

शिक्षकांनी चक्क महायज्ञाला अर्पण केली ‘पदवी’

लातूर प्रतिनिधी | लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी एका अनोख्या महायज्ञाचे आयोजन करून आंदोलन केले. महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. हे सर्व शिक्षक विनाअनुदानित शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आले आहेत. मात्र या विनाअनुदानित शाळांना अनुदान नसल्यामुळे आम्ही विनावेतन नोकरी करीत आहेत.त्यामुळे … Read more

तिकीट मिळण्याच्या खात्रीमुळेच शिवसेनेत प्रवेश करत आहे

करमाळा प्रतिनिधी | करमाळ्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी सोडत उद्या ता.२० ऑगस्ट (मंगळवार)ला दुपारी १२ वाजता मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. करमाळा येथिल बागल गटाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे . या तीन अटीवर रामराजे निंबाळकर करणार भाजपमध्ये प्रवेश … Read more

दिलीप सोपल शिवसेनेत?

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यापासून होत्या. त्या चर्चा आता सत्यात उतरताना दिसत आहेत. कारण आपण पक्षांतराच्या विचारात आहे असे स्वतः दिलीप सोपल यांनी सांगितले आहे. कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करून दिलीप सोपल यांनी पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार असल्याचे देखील म्हणले आहे. भाजप नेत्याचा … Read more

माढ्याच्या शिंदे बंधूनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

मुंबई प्रतिनिधी | माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीने राजकीय विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे स्वतःचे राजकीय पुनर्वसन व्य्वस्थितीत केले … Read more