सलग सुट्ट्यांमुळे एसटीच्या जादा बसेस धावणार

औरंगाबाद | आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारची सुट्टी, रविवारी 15 ऑगस्टची सुट्टी तर सोमवारी पारशी नव वर्षाची सुट्टी अशा प्रकारे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता शक्यता असल्याने एसटी महामंडळाने विविध मार्गांवर जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता सर्व आगार प्रमुखांनी विविध मार्गांवर जादा वाहतूक करण्याचे नियोजन सुरू … Read more

मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; उच्च न्यायालयात जनहित याचिका

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेले असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. याचिकेवरील पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर काही दिवसांपूर्वी शहरात बॅंकींगच्या परिक्षेसाठी अपंग विद्यार्थी आला … Read more

प्रवासी मिळविण्यासाठी एसटी बस स्थानक सोडून ‘रस्त्यावर’ केली उभी

ST Bus

औरंगाबाद/ नवनीत तापडिया | मागील १७ ते १८ महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. मध्यंतरी काही दिवस यामध्ये शिथिलता दिली असली तरी, पुन्हा रुग्ण वाढत असल्याने निर्बंध घालून देण्यात आले होते. यादरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस देखील बस स्थानकात उभ्या होत्या. परंतु आता … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर! सर्वसामान्यांची लालपरी विविध मार्गावर सुरू

औरंगाबाद : अडीच महिन्यांच्या खंडानंतर एसटी महामंडळाच्या बस सेवेला 1 जून पासून सुरुवात झाली असून गुरुवारी औरंगाबाद विभागातून पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, जालना आदी मार्गावर सुमारे 26 बसेस धावण्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली. एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनाच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले होते. यामुळे एसटीला ही प्रवासी … Read more

खाजगी वाहतुकीला शासनाचा आशीर्वाद ; निर्बंध फक्त एस टी महामंडळालाच का ?

  औरंगाबाद | मागील एका वर्षाहून अधीक काळापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना सरकार आणि प्रशासनाच्या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊन चे हत्यार उपसले आहे. सध्या राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच … Read more

एसटी बस चालकांची दयनीय अवस्था; महामंडळाचे चालकावर दुर्लक्ष

  औरंगाबाद | कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, बस चालक हे काम करत आहे आणि महत्वाचे म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रवासात मदत करणारे बस चालक यांच्याकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करत आहे. कोरोनाच्या संकट समयी बस चालक काम करत असताना त्यांना जेवनाची सोय नाही आणि त्यांना विश्राम करण्यासाठी दिलेली जागेची … Read more

औरंगाबादमध्ये दुचाकी आणि बसचा भीषण अपघात; एक ठार एक जखमी;

औरंगाबाद । औरंगाबादमध्ये दुचाकी आणि बसचा भीषण अपघात मिळत आहे. एका दुचाकीला पाठीमागून बस धडकल्याने झालेल्याअपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शहरातील सिडको बस स्थानका जवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन्ही तरुण (एम.एच.20 व्ही.4412) या दुचाकीवरून जात होते. दरम्यान, जालना जाणारी बस क्रमांक (एम.एच.20 बीएल2907) याबससमोर आले … Read more

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना दिवाळीचा बोनस; सणासुदीत तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या सोडणार

मुंबई । राज्यात सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची संख्या, गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळानं ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकांवरून सुटणार आहेत. सध्या … Read more

खुशखबर! एसटी बसेसला एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतुकीची परवानगी

मुंबई । राज्य सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता … Read more

गुड न्यूज! ‘या’ जिल्ह्यांत उद्यापासून एसटी प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार; ‘हे’ असतील नियम

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारी ‘लालपरी’ म्हणजेच आपली एसटी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रूजू होत आहे. रेडझोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात तब्बल दोन महिन्यांनंतर उद्या शुक्रवारपासून जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरू होत आहे. कोरोना साथीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून … Read more