…अन अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर

0
66
ajintha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.याचा मोठा फटका प्रवासी आणि पर्यटकांना बसत आहे. आज सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची बस बंद असल्याने मोठी गैरसोय झाली. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी बैलगाडीची व्यवस्था केल्याने पर्यटकांना लेणींमध्ये जाण्यासाठी बैलगाडीची सवारी मिळाली.

एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात दुसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बस वाहतूक बंदचा फटका जिल्ह्यातील पर्यटनस्थळी आलेल्या पर्यटकांना सुद्धा बसला आहे.

आज सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक लेणीकडे जाण्यासाठी बस नसल्याने हतबल झाले होते. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी पर्यटकांची गरज ओळखून बैलगाडीची व्यवस्था केली. यामुळे पर्यटक बैलगाडीतून लेणीपर्यंत पोहचले. अनेक पर्यटकांनी बैलगाडीतून सफर झाल्याने आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here