लॉकडाउनमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकीत; महामंडळाला हवेत ३०० कोटी

मुंबई । लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात सध्या अविरतपणे परप्रांतीय मजूर, विद्यार्थी यांची ने आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मात्र धोक्यात आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ३०० कोटींची मदत द्या, नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल-मे महिन्यांचे पगार देणं कठीण होईल, अशी मागणी इंटकने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली … Read more

एसटी प्रवास सेवा स्थगित करण्यामागे राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिल ‘हे’ कारण

मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा अनेक ठिकाणी विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले आहेत. याविषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार … Read more

एसटीची मोफत बस प्रवास सेवा स्थगित; प्रशासकीय पातळीवर गोंधळ

मुंबई । लॉकडाऊनमुळं शहारत अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना घरी परतण्यासाठी एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळं सोमवारपासून सुरू होणारी मोफत सेवा आता अचानक स्थगित करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आदेशाचे गोंधळ कायम असल्याचे दिसून येते. शनिवारी ९ … Read more

राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘घरवापसी’साठी राज्यातून ९२ बस रवाना

मुंबई । राजस्थानमधील कोटा येथे लॉकडाऊनमुळं अडकलेल्या महाराष्ट्रातील १ हजार ७८० विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्यातून ९२ बस रवाना झाल्या आहेत. आज रात्री या बस कोटा येथे पोहोचतील. राजस्थानच्या दिशेनं रवाना केलेल्या ९२ बसपैकी ७० बस या राज्य परिवहन विभागाच्या असून, उर्वरित बस खासगी आहेत. या बसेस रायगड आणि बीड जिल्ह्यातून सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती … Read more

कोटा येथील विद्यार्थ्यांची होणार ‘घरवापसी’; राज्य सरकार पाठवणार ९० एसटी बस

मुंबई । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचललं आहे. कोटा येथे अडकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एकूण ९० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना … Read more

एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू,क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्याला बसणार चाप

कोल्हापूर जिल्ह्यात एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू केलंय. एसटीकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या तक्रारी नंतर जिल्ह्यात कारवाई सुरू झालीय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी आढळणाऱ्या बसेसवर कारवाई सुरू केलीय.

बस आणि कारचा भीषण अपघात, आठ वर्षीय बालिका जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गिरड रोडवर आज सकाळी कार आणि एसटी बस चा भीषण अपघात झाला. यामधे कार मधील आठ वर्षीय बालिका जागीच ठार झालीय तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. काकणबर्डी ते ओझर रस्त्यावर पाचोऱ्याकडून एरंडोलकडे जाणाऱ्या बस ने ( क्र. एम एच 20 डी 9538) व एरंडोल येथून पिंपळगाव … Read more