अतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल – अमित शहा

‘अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता करेन’ असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार उदयनराजे आणि अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची अमित शहा यांनी उपस्थित लोकांना विनंती केली.

उदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे

मी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा, आता मात्र फक्त राष्ट्रवादाचा नाद इथे घुमेल असं म्हणत उदयनराजेंच्या येण्यामुळे हे सरकार आणखी मोठं बनणार असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले

आदित्यला उदयनराजेंची ‘जादू की झप्पी’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर सभा घेतली. पाटण विधानसभेचे शिवसेना उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले माजी खासदार उदयनराजे भोसलेही मंचावर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले मंचावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. मात्र त्याचवेळी उदयनराजेंनी पाया पडणाऱ्या आदित्य ठाकरेंना उठवत, त्यांना अलिंगन दिलं. उदयनराजेंनी आदित्यला एकप्रकारे जादू की झप्पीच दिली.

जेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर दिवस

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराला आता रंगत चढली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेसुद्धा तयारीत असताना प्रचाराच्या घाई-गडबडीत दोन नेत्यांनी वडापाव खात आपली भूक भागवून घेतली.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.

अनुभवी मिशीवाला उदयन भोसलेंना भारी पडणार का??

सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी उदयन भोसलेंच्या विरुद्ध लढणार आहे. ज्या नेत्याला लोकांनी दिलेल्या मतदारांचा आदर करता येत नाही तो लोकांसाठी काय काम करणार असा टोलाही यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लगावला.

शिवेंद्रसिंह आणि उदयन भोसले भव्य रॅलीद्वारे करणार शक्तीप्रदर्शन ; आज भरणार उमेदवारी अर्ज

सातारा-जावलीमधील भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंह भोसले हे आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयन भोसले हेसुद्धा आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब..!! २ दिवसांत कळणार अधिकृत निर्णय

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

उदयन भोसलेंच्या मुलाचा अनोखा पराक्रम ; १४ व्या वर्षी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेचं प्रमाणपत्र

छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज आणि उदयन भोसले यांचे चिरंजीव विरप्रताप याने नुकत्याच थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. अवघ्या चौदाव्या वर्षी या स्पर्धेत त्याने प्रमाणपत्र मिळवले आहे.

लोकसभा पोटनिवडणूक : उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आघाडीचे उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निडणुकीच्या सोबत लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने हि जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. [youtube https://www.youtube.com/watch?v=fnU1IHkp9iY&w=560&h=315] … Read more