विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही … Read more

बनारस हिंदू विद्यापीठात मिळणार भूत विद्येचे शिक्षण; लवकरच चालू होणार ६ महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स

नवी दिल्ली : भूत, अलौकिक किंवा अनैसर्गिकदृष्ट्या रहस्यमय जगाच्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल जाणून घेण्यास आपणास नेहमीच उत्सुकता आहे का? तसे असल्यास, आपण आता या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) ‘भूत विद्या’ किंवा ‘पॅरानॉर्मल सायन्स’चा अभ्यास करू शकता. घोस्टोलॉजी एक मानसोपचार आहे आणि सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात, डॉक्टर मानसिक विकार आणि … Read more

अमरावती विद्यापीठात मूल्यांकनासाठी तब्बल ८१० परीक्षक

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात पेंडालमध्ये परीक्षकांकडून मूल्यांकनाची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. काल म्हणजेच शुक्रवारीतब्बल ८१० परीक्षाकांनी उपस्थिती लावली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षकांनी उपस्थिती दर्शविल्याने पेंडालदेखील मूल्यांकनास कमी पडला असल्याचे निदर्शनास आले.