‘त्या’ प्रकरणात विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे अखेर निलंबित

bAMU

औरंगाबाद – शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. या माहितीस विद्यापीठाचे उपकुलसचिव (आस्थापना) गणेश मंझा यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबित होण्याची नामुष्की ओढवली आहे. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे याने रात्रीच्यावेळी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याची तक्रार एका विद्यार्थिनी बेगमपुरा … Read more

संतपीठाचे अभ्यासक्रम तातडीने होणार सुरु, शैक्षणिक व्यवस्थापन बामू विद्यापीठाकडे

bAMU

औरंगाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच नऊ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय निर्गमित केला आहे. यामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे. पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, … Read more

विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांची सखोल चौकशी करा – अभाविप

bAMU

औरंगाबाद – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असून प्रकरणात संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत विद्यापीठ प्रशासनाने समिती गठित करून सखोल चौकशी … Read more

विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा भलताच उद्योग; रात्री-अपरात्री मुलींना मेसेजेस करुन करत होता ‘संपर्क’

bAMU

औरंगाबाद – विद्यापीठ म्हणजे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. हजारो विद्यार्थी त्याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात तर तेथील अधिकारी, कर्मचारी, प्रशासन, शिक्षक आपले विद्यापीठ शिक्षणात कसे अग्रेसर राहिल यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु काही अधिकारी, कर्माचारी आपल्या पदाचा गैरवापर करून गैरकृत्य केल्याचा अनेक घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

विद्यापीठात 34 पैकी 28 प्राध्यापकांना सरकारी वेतन, 6 प्राध्यापक वाऱ्यावर

university

औरंगाबाद | राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 34 प्राध्यापकांपैकी 28 प्राध्यापकांच्या वेतनाची जबाबदारी स्विकारली आहे. परंतु उरलेल्या सहा प्राध्यापकांना वाऱ्यावर का सोडले असा प्रश्न विचारला आहे. राज्य सरकारकडे सर्वजण पाठपुरावा करत असून 28 प्राध्यापकांचे वेतन आता ई – सेवार्थ प्रणालीद्वारे दिली जाणार आहे. सरकारने जानेवारी 2015 रोजी हा निर्णय घेतला होता. आता या … Read more

कोरोनात पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ; डॉ.बामु विद्यापीठाचा निर्णय

university

औरंगाबाद | कोविडमुळे ज्या मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. कोविडच्या धरतीवर विविध प्रकारचे शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, परिसर, उस्मानाबाद, परिसर तसेच बीड उस्मानाबाद जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी … Read more

विद्यापीठात ‘या’ पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला झाली सुरुवात

bAMU

औरंगाबाद – शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच उस्मानाबाद उप परिसरातील सर्व विद्याशाखांतील बारावी उत्तीर्ण या पात्रते वरील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यापीठात बुधवारपासून नऊ पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी 3 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर … Read more

विद्यापीठाच्या वर्धापनदिनिच 11 अभ्यासक्रम विद्यापीठाने केले बंद

bAMU

औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसल्याचे कारण दाखवत अकरा अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विशेष म्हणजे काल विद्यापीठाचा 63 वा वर्धापन दिन होता याच दिवशी हा दुर्दैवी निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अशी टीका अनेक शिक्षण तज्ञांनी … Read more

विद्यापीठात लवकरच सुरू होणार सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क

university

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 63 व्या वर्षात पदार्पण केले असून विज्ञान विषयात रस वाढवण्यासाठी ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ च्या कामाला गती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठीच्या या प्रकल्पात सात गॅलरी सोबतच एमपी थ्रीएटर असलेले हे कक्ष 28 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने सर्वांसाठी खुले करण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी … Read more

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठ कमी करणार – अभाविप

abvp

औरंगाबाद – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची काल भेट घेऊन विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अभाविपच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांना विविध शुल्क माफ करण्यात यावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये जिमखाना शुल्क, विविध … Read more