गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

सोलापूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतरणाचा फटका बसतोय तसाच फटका आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पकड मजबूत करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला बसण्याची शक्यता. कारण वंचित आघाडीतील वरच्या फळीतील नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे पक्षांतरणाच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार … Read more

वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये फुटू

औरंगाबाद प्रतिनिधी | वंचित आघाडीचा घटक असणाऱ्या एमआयएममध्ये आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यात पहिल्यासारखे प्रेम राहिले नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. कारण वंचित आघाडीच्या धोरणावर एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एमआयएम आणि वंचितचे नाते कसे राहील याबद्दल खात्रीलायक काहीच सांगता येणार नाही. काही दिवसापूर्वी आम्ही आम्हाला हव्या … Read more

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

सोलापूर प्रतिनिधी | लोकसभा निव़डणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. पडळकर विजयी झाले नसले तरी आघाडीच्या नेत्यांसाठी पडळकरांसह सर्वच ठिकाणचे वंचितचे उमेदवार आव्हान ठरले होते. मतांच्या राजकारणात पडळकर यांच्या आरएसएस सोबतच्या संबंधांवरूनही टीका करण्यात आली होती. सर्व टीकी टिप्प्णींना डावलून लोकसभा निवडणुकीत पडळकर … Read more

वंचित खेळतंय काँग्रेस आघाडीसोबत पाठशिवणीचा खेळ ; आघाडीची मोठी ऑफर वंचितने धुडकावली

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला वंचित आघाडीने काँग्रेसचे चांगलेच कंबरडे मोडले असताना आता काँग्रेस वंचितला आपल्यात सामावून घ्यायला शर्थीचे प्रयत्न करत आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईमधील निवासस्थळी काँग्रेसचे नेते आणि वंचितचे नेते यांच्यात परवा महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. त्या बैठकीत देखील आघाडीचा तोडगा निघाला नाही असे सूत्रांनी सांगितले आहे. नवरा कामावर गेला की … Read more

पूरग्रस्त ब्रह्मनळी गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

सांगली प्रतिनिधी |  आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी पोचण्यात उशीर झालेले ब्रम्हनळी गावाच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या बोटीने प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र नदीच्या पात्राच्या मधोमध गेल्यावर बोट पलटून झालेल्या अपघातात १७ लोकांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर आता हेच गाव वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले आहे. ब्रह्मनळी ग्रामपंचायतीची स्वतःची बोट होती. प्रशासनाने मदतीला येण्यास उशीर … Read more

कपबशी नव्हे हे असणार वंचित आघाडीचे चिन्ह ; निवडणूक आयोगाचा चिन्ह बदलाचा निर्णय

नवी दिल्ली |  महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यातच संपन्न होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घेणे क्रमप्राप्त असणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना … Read more

कॉंग्रेसचा हा माजी मंत्री वंचितकडून लढवणार विधनासभा निवडणूक?

मुंबई प्रतिनिधी  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ जूलै रोजी मुंबई काँग्रेसच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्या. मात्र या मुलखतीकडे आघाडी सरकार मधील माजी मंत्र्यांनी पाठ फिरवली असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, माजी मंत्री सुरेश शेट्टी … Read more

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

पुणे प्रतिनिधी | प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत फारकत घेऊन त्यांच्यावर टीका करत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडीत फूट पडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी देखील झाले. तर त्यांनी आज नव्या पक्षाची देखील घोषणा देखील केली आहे. लक्ष्मण माने यांच्या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी असे नाव असणार आहे.या संदर्भात त्यांनी पुण्यातील अरोरा टॉवर येथे … Read more

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार

अमरावती प्रतिनिधी | माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत वंचित बहुजन आघाडीत जाणार असल्याची चर्चा आता चांगलीच रंगात आली आहे. रावसाहेब शेखावत यांनी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असल्याचे देखील बोलले जाते आहे. त्याच प्रमाणे त्यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचे कबूल केले आहे. काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसमधील लोकांच्या राजकारणाला सुरुंग … Read more