‘काँग्रेस हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत’- प्रकाश आंबेडकर

“काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर चंद्रपूरमधील बल्लारपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

जेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर दिवस

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराला आता रंगत चढली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेसुद्धा तयारीत असताना प्रचाराच्या घाई-गडबडीत दोन नेत्यांनी वडापाव खात आपली भूक भागवून घेतली.

नारायण राणेंना पक्ष विलीनीकरणाचा मुहूर्त मिळाला?

गेली अनेक दिवस भाजपात जाण्यासाठी नारायण राणे वाट पाहत आहेत. अखेर आपल्या स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी राणेंना मुहूर्त मिळाला आहे. लवकरच राणेंच्या पक्षाचे भाजपात विलीनीकरण होणार आहे. या बहुप्रतीक्षित विलनीकरणाचे संकेत सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले.

‘घरात आलबेल आहे सांगण्याची पाळी का येते?’, सुरेश धस यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

धस हे ‘महायुती’चे उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड मतदार संघातील रायमोहा येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, जयदत्त क्षिरसागर रमेश पोकळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

भाजपात असल्याचा महाडिकांना पडला विसर; राष्ट्रवादीला मतदान करा म्हणून केले आवाहन

आपले चुलत बंधू अमोल महाडीक यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे घेतलेल्या सभेदरम्यान मतदान करण्याचा आवाहन करताना ‘धनंजय महाडिक यांनी चक्क घड्याळ निशाणीसमोरील बटन दाबण्याचे’ उपस्थितांना आवाहन केले. मात्र आपली चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी ‘कमळ चिन्हा’चा उल्लेख करताच सभास्थळी एकच मोठा हशा पिकला. दरम्यान शरीराने भाजपा मध्ये गेलेल्या धनंजय महाडिकांच्या हृदयात मात्र ते म्हणतात त्या प्रमाणे शरद पवारच असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

तर तेजस ठाकरे होणार ‘युवासेना प्रमुख’ ?

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असतानाच आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे कारण म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकीय व्यासपिठांवर वाढलेला वावर. बुधवारी तेजस हे संगमनेरमधील शिवसेनेच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसून आले. यानंतर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ांत आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.