ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

मतदारांनो जादूचे प्रयोग बघा; बसपाकडून वाशिममध्ये अनोखा प्रचार

मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहे.

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

२७ पैशांची भिक? मतदानापूर्वी हा मेसेज होतोय बेक्कार व्हायरल 

टीम हॅलो महाराष्ट्र | आगामी विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूपच व्हायरल होत आहे. त्यात लोकांना आपले मत न विकण्याचा महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. यात एका भिकाऱ्याचे उदाहरण दिले गेले आहे. त्यात तुम्ही भिकाऱ्याला २७ पैशांची भीक देतात का असा प्रश्न उपस्थित … Read more

कहर!! आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. आदर्श आचारसंहितेचा पालन व्हावं यासाठी आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी सह्जरित्या करण्यासाठी ‘सी व्हिजील’ हे अँप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलं आहे. या अँपवर गुरुवारपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

उत्तर नागपूरच्या आ. मिलिंद मानेंना नागरिकांनी घेतले फैलावर

आज प्रचारादरम्यान मानेंना जनतेच्या विरोधाचा चांगलाच सामना करावा लागला. उत्तर नागपूर परिसरात भाजपाचे उमेदवार असलेले माने प्रचारासाठी गेले असता लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्यावर पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारत प्रश्नांचा मारा करत ”मागील पाच वर्षे कोठे होता?” असा सवाल करण्यात आला. यामुळे माने चांगलेच भांबावल्याचे पहायला मिळाले. यावेळी परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसून आले.

राहुल गांधी घेणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचारात उडी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. ते महाराष्ट्रात दोन दिवस प्रचार करणार आहेत. राहुल गांधी नुकतेच कंबोडिया दौरयावरून मायदेशी परतले आहेत. राहुल गांधी हे प्रचारासाठी मैदानात उतरणार असून आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकदीनीशी लढवू असं मत काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी व्यक्त केलं.

छगन भुजबळांना मोठा धक्का! माणिकराव शिंदेंचा सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्यानंतर येवल्यातून शिवसेनेनं संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. कारण, भुजबळांवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्याशी हात मिळवणी केली आहे. निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे येवल्यामध्ये राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेची ताकद वाढली अशी चर्चा आहे.

म्हणुन आम्ही मुक्ताईनगरातून माघार घेतली, रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी पवारांचा मास्टर प्लान

जळगाव प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी लढत रंगली आहे. पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीने मुक्ताईनगर मधून माघार घेत पाटील यांना पाठींबा दिला आहे. आपण जाणीवपूर्विकच माघार घेतली असून आता एक एक जागा महत्वाची आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले … Read more

प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगांत घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही – आडम मास्तर

सोलापूर प्रतिनिधी | राज्याभर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. असाच एका प्रचार सभेत कामगार नेते आडम मास्तर यांची जीभ घसरली आहे. प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

सर्व राजकारण्यांची संपत्ती वाढली मात्र आडम मास्तरवर गुन्हे वाढले असं वर्तमान पत्रात आलं होतं. माझ्यावर आत्तापर्यंत १६५ गुन्हे दाखल आहेत. आणि गुन्ह्यांची डबल सेंच्यूरी मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आपल्यावरील गुन्हे हे आपल्यासाठी अलंकार असल्याचं म्हटलं आहे.

माझ्यावर इतके गुन्हे नोंद असून मी भित नाही. मी परवानगी नसताना सत्याग्रह केले, आंदोलनं कली, मोर्चे काढले. हे सगळं लोकांसाठी केलं असं सागत काही जणांवर नुसते पाच गुन्हे नोंद काय झाले तर ते थरथर कापायला लागतात असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला.