शरद पवारांचा पद्मविभूषण माघारी घेणार आहात कां? विक्रम ढोणे यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सागंली मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. मात्र तो विरोध करण्याचा नैतिक अधिकार भाजपला नाही. पवार हे भाजपच्यादृष्टीने नैतिकता नसलेले राजकारणी असतील तर भाजप सरकारने पवारांना पद्यविभूषण सन्मान देऊन कां गौरविले, याचे … Read more

अहिल्यादेवींची अवहेलना झाल्यास 27 मार्चला आत्मदहन; विक्रम ढोणे यांचा इशारा

सांगली ः गतवर्षी जेजुरी (जि. पुणे) येथील अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरण कार्यक्रमापुर्वी हुल्लडबाजी करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींची अवहेलना केली होती. त्याची पुनरावृत्ती सांगलीत घडल्यास २७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेल्या स्मारकाचे उदघाटन हे शांतता आणि … Read more

राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा; विक्रम ढोणे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याला राज्य सरकारची उदासीनता आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांची आडमुठेपणा कारणीभूत आहे. त्याबरोबरच राज्य मागासवर्ग आयोगाचा दर्जाही यानिमित्ताने स्पष्ट झाला आहे. त्यामुळे बोगस सदस्यांचा भरणा असलेला राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने बरखास्त करावा, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे … Read more

जेजुरी हुल्लडबाजीप्रकरणी पडळकरांवर कारवाई का नाही केली? विक्रम ढोणे यांचा सवाल

पुणेः जेजुरी गडावर वर्षभरापुर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व कार्यकर्त्यांनी घातलेल्या धुडगूस प्रकरणात वर्षभरात पोलिस कारवाई झालेली नाही. त्यामुळे दंगेखोर प्रवृत्तींना बळ मिळत असल्याची भुमिका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडली आहे. संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अहिल्यादेवींचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०२१ रोजी जेजुरी … Read more

राज्य मागासवर्ग आयोगातील अपात्र सदस्यांना मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संरक्षण ; विक्रम ढोणे यांचा घणाघात

मुंबई । सद्या गाजत असलेल्या आरोग्य भरती, म्हाडा भरती आणि टीईटीच्या परीक्षेप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य निवडीतही घोटाळा करण्यात आला आहे. राजकीय सोयीसाठी अपात्र सदस्य आयोगावर घुसडण्यात आले आहेत. त्यांच्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरीकल डेटा (जातीनिहाय वस्तुनिष्ठ माहिती) सदोष होण्याचा धोका आहे. त्यामुळे याप्रश्नी राज्य सरकार तसेच ओबीसी बांधवांनी सजग राहण्याची गरज असल्याचे धनगर … Read more

‘राज्य मागासवर्ग आयोगाचे सक्षमीकरणाच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार’ – विक्रम ढोणे

मुंबई । राज्यातील मागास घटकांच्या भवितव्यात महत्वाची भुमिका असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारच्या अनास्थेमुळे दुर्दशा झालेली आहे. निधी व मनुष्यबळाची कमतरता व अपात्र सदस्यांचा भरणा असल्यामुळे या आयोगाकडून दर्जेदार काम होणे अवघड आहे. यापार्श्वभुमीवर आयोगाचे सक्षमीकरण करण्याच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक … Read more

विजय वडेट्टीवार यांनीच मागासवर्ग आयोगाचा बट्ट्याबोळ केला; विक्रम ढोणे यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या सात आठ महिन्यांत ओबीसी हिताचा मोठा कळवळा दाखविणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रत्यक्ष कृती ओबीसींचे अपरिमीत नुकसान करणारी आहे. वडेट्टीवार यांच्या विभागाच्या माध्यमातून नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियुक्तीत घोटाळा झाला असून काही पात्रता नसणारे सदस्य आयोगाच्या माथी मारण्यात आले आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वडेट्टीवार यांनी … Read more

धनगर विवेक जागृतीचे विक्रम ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबाबत आवाज उठवत असलेले धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा भाऊ अशी ओळख सांगणाऱ्या मारूती हाके याच्यावर सांगली जिल्ह्यातील जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांचे कागदपत्र … Read more

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके हे बोगस प्राध्यापक : विक्रम ढोणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके हे प्राध्यापक नसून ठेकेदार आहेत. त्यांनी पद मिळवण्यासाठी शासनाला खोटी माहिती दिली आहे. मात्र या माहितीची सत्यता न तपासताच त्यांना सचिव दर्जाचे पद बहाल करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक बनून हाके यांनी ही बेकायदेशीर नियुक्ती मिळवली … Read more

राज्य मागासवर्ग आयोगात गडबड घोटाळा, सदस्यांचा व्हेराफाईट डेटा जाहीर करा : विक्रम ढोणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे भवितव्य हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या हाती आहे. या आयोगाने ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार केला अन तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला तरच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न आणि पर्यायाने निवडणुकीचा विषय मार्गी लागणार आहे. मात्र या आयोगावरील सदस्यांची नेमणूक बेकायदेशीर पद्धतीने झालेली असल्याने त्यांच्या कामाचा दर्जा प्रश्नांकित आहे. … Read more