म्हणुन प्रशासनाने स्वत: 1 हजार 800 लिटल भेसळीचे दूध केले नष्ट

सोलापूर प्रतिनिधी |  बाजारात विक्रीसाठी आलेले भेसळीचे 1800 लिटर दूध पंढरपूर जवळ नष्ट करण्यात आले. ही कारवाई सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. भेसळ रोखण्यासाठी अनेक कडक कायदे करून दूध माफिया सर्व सामान्य लोकांच्या जीवांशी खेळत असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील शेगाव येथील सांबकांथा या खासगी दूध डेअरीवर कारवाई केली … Read more

जानेवारीत UPI पेमेंट विक्रमी पातळीवर पोहोचले, 4.3 लाख कोटी रुपयांचे झाले व्यवहार

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या वेळी भारतातील लोकांनी एक नवीन विक्रम नोंदविला आहे. खरं तर, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, देशभरातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) आधारित व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे. नीती आयोगाचे (NITI Aayog) मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत व्यवहार मूल्य … Read more

SBI ने 40 कोटी ग्राहकांना दिली आहे मोठी सुविधा, आता घरबसल्या अपडेट करा नॉमिनी व्यक्तीचे डिटेल्स

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) ने देशातील कोट्यावधी ग्राहकांना मोठी सुविधा दिली आहे. आतापासून आपण घरबसल्या आपल्या खात्यात सहजपणे नॉमिनी व्यक्तीचे नाव जोडू शकाल. बँकेने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. एसबीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. आपण खात्यात नॉमिनी व्यक्तीचे नाव कसे समाविष्ट करू शकता ते … Read more

राज्यातील किमान तापमानात मोठी घट; पुणे 10.7° c तर गडचिरोली 10°c वर

मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस पुणे : उत्तरेकडील वार्‍याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर … Read more

तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

असा बनवा गोभी मुसल्लम; जाणुन घ्या रेसिपी

Hello रेसिपी | गोभी मस्सलमची सोपी पद्धत आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठीची पाककृती आणि लागणारे साहित्य खाली दिले आहे. लागणारे जिन्नस: अख्खा फ्लॉवर चटणी साठी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड ग्रेव्हीसाठी तेल / तूप / बटर यापैकी काहीही कितीही मोहरी जिरे बडीशेप आले किस लसूण किस बारीक … Read more

LPG Gas Cylinder Price: LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला, नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडर (LPG Gas) च्या किंमतीत वाढ केली आहे. आजपासून तुम्हाला घरगुती एलपीजीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलेंडर्सच्या किंमतीत 6 रुपयांनी कपात केली आहे. … Read more

लष्करासमोर उठाव करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता: म्यानमारचे लष्करप्रुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्यानमारच्या लष्कराने उठाव करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. लष्कराने म्यानमारच्या अनेक मोठ्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. काहींना त्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये नजरकैद करून ठेवले आहे. हे एक नियोजित बंड असल्याचे अनेक देश बोलत आहेत. दरम्यान, म्यानमारचे लष्करप्रमुख या विषयावर बोलते झाले आहेत. त्यांनी लष्करी उठाव करण्यामागील कारण सांगितले आहे. म्यानमार खूप … Read more

UAE मध्ये जाण्याचा प्लॅन करताय सावधान ! सौदी अरेबियाने दिली 20 देशांच्या हवाई वाहतुकीला स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सौदी अरेबियाने भरतासह 20 देशातील हवाई वाहतूक स्थगित केली आहे. या बंदीनंतर सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांचे नातेवाईक, डॉक्टर व फक्त सौदी अरेबियाचे नागरिकच सौदी अरेबियामध्ये प्रवेश करू शकतील. 3 फेब्रुवारीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने देशातील करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन हवाई वाहतूक स्थगितीचा … Read more

सलग दुसर्‍या महिन्यात निर्यातीत झाली वाढ, व्यापार तूट कमी होऊन 14.75 अब्ज डॉलर्सवर गेली

नवी दिल्ली । जानेवारी 2021 मध्ये देशाची निर्यात (Exports) 5.37 टक्क्यांनी वाढून 27.24 अब्ज डॉलरवर गेली. यात प्रामुख्याने फार्मास्युटिकल्स (Pharmaceuticals) आणि अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रांचे योगदान होते. सोमवारी वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. डिसेंबर 2020 मध्ये देशाच्या वस्तू निर्यातीत 0.14 टक्के वाढ नोंदली गेली. व्यापार तूट कमी आकडेवारीनुसार या कालावधीत आयात दोन टक्क्यांनी … Read more