असा बनवा गोभी मुसल्लम; जाणुन घ्या रेसिपी

Hello रेसिपी | गोभी मस्सलमची सोपी पद्धत आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठीची पाककृती आणि लागणारे साहित्य खाली दिले आहे.

लागणारे जिन्नस:
अख्खा फ्लॉवर
चटणी साठी
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लसूण
पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड
ग्रेव्हीसाठी
तेल / तूप / बटर यापैकी काहीही कितीही
मोहरी
जिरे
बडीशेप
आले किस
लसूण किस
बारीक कांदा चिरून
दोन टोमॅटो बारीक चिरून
7,8 टोमॅटो किसून पल्प
मेथी पाला अर्धी किंवा एक मूठ
अर्धी वाटी काजू पाण्यात घालून ठेवावेत , मिक्सर मधून वाटून घ्यावेत
दही अर्धी वाटी
पाणी
मीठ
साखर

मसाले
गरम मसाला
लवंग

क्रमवार पाककृती:
1. अख्खा फ्लॉवर पाण्यात शिजवावा, थोडी हळद , एखादा लवंग , थोडे लाल तिखट , मीठ घालावे , 50 % शिजवून घ्यावा.

2. फ्लॉवर शिजत असताना हिरवी चटणी करून घ्यावी. कोथिंबीर , एखादी मिरची , लसूण मिस्करमध्ये फिरवून बारीक चटणी करावी , त्याला थिकनेस यायला पंढरपुरी डाळ्याची पूड मिसळून घ्यावी

3. ग्रेव्ही करताना तेल घ्यावे , मोहरी जिरे बडीशेप घालून तडतडावे , आले , लसूण किस घालावा , मिरचीचे तुकडे घालावेत , कांदा घालावा, एखादा ढब्बू मिरची बारीक करून घातला तरी चालेल , टोमॅटो बारीक चिरलेला घालून शिजवावे , मेथी पाला मूठभर घालून शिजवावा शेवटी टोमाटो प्युरी , घालून हलवून शिजवावे , गरम मसाला, हळद , तिखट , मीठ , थोडी साखर घालावी, मग काजू पेस्ट घालावी , भरपूर हलवून मंद आचेवर शिजवावे , शेवटी दही घालून मिसळून फिरवून घ्यावे, गरजेनुसार पाणी घालावे

4. फ्लॉवर उलट करावा, त्यात खाचात हिरवी चटणी दाबून भरावी , ही चटणी भरण्याची क्रिया रणबीर ब्रार च्या व्हिडिओत आहे , इतर कुठे दिसली नाही.

5. मग हा फ्लॉवर ग्रेव्हीत सोडावा, त्याला ग्रेव्हीने आंघोळ घालावी व झाकण लावून मंद आचेवर शिजवावे.

चपाती , भात काहीही चालेल , दहीभात यासोबत मस्त लागतो.

वाढणी/प्रमाण:
4
अधिक टिपा:
ग्रेव्हीच्या भरपूर व्हरायटी नेटवर उपलब्ध आहेत

ओव्हनमध्येही करतात , त्याने ग्रेव्हीदेखील लाव्हा क्रस्टप्रमाणे होऊ शकेल

हिरवी चटणी ऑप्शनल आहे.

रणवीर ब्रारने ग्रेव्ही दह्याचीच बनवली आहे.

ओल्या नारळाचे दूधही ग्रेव्हीत वापरतात.

टोमॅटो आणि काजू पेस्ट हे मात्र सर्वत्र कॉमन दिसले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like