फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना कायमसाठी वर्क फ्रॉम होम, परंतु…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या दरम्यान, फेसबुकने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम देण्याची ऑफर दिली आहे. कंपनी ही ऑफर बर्‍याच काळासाठी सुरू ठेवू शकते. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की,’ कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना कायमचेच वर्क फ्रॉम होम करण्याची ऑफर देऊ शकते. झुकेरबर्ग म्हणाले की,’ फेसबुकला ‘वर्क फ्रॉम होम’ या … Read more

लॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा?

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू असल्यामुळं जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांच्या कामकाजांवर निर्बंध आले आहेत. सरकारी काम ठप्प पडू नये म्हणून खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा केंद्रानं दिली होती. दरम्यान, आता केंद्र सरकार पुढील काळासाठीही आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देण्याचा विचार करीत आहे. याबाबत नव्या नियमावलीचा मसुदाही … Read more

Twitter ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी केली मोठी घोषणा, कायमचे Work From Home करण्यासाठी दिली सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे अनेक देशांमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही आहे. म्हणूनच, हा संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सोशल डिस्टंसिंग. हेच लक्षात घेऊन ट्विटरने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या कर्मचार्‍यांना … Read more

ऑनलाईन चोरट्यांपासून स्वत:ला कंगाल होण्यापासून वाचवा! समजून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बरेच लोक लॉकडाऊनच्या वेळी घरूनच काम करत आहेत.अशा परिस्थितीत “ऑनलाइन फसवणूक” टाळणे हे देखील खूप महत्वाचे आहे.हॅकर्स फक्त आपल्या चुकीच्या प्रतीक्षेत आहेत. हॅकर्सच्या युक्तीमुळे आणि लोकांच्या फक्त काही चुकांमुळे फोन चालवून लोक लाखोचे नुकसान करून घेत आहेत अशी बरीच प्रकरणे समोर येत आहेत. परंतु काही पावले उचलून आपण या चोरांना … Read more

‘आयटी’वाल्यांना आता ३१ जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा

मुंबई । माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मंगळवारी केली. आयटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. आता हा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढण्यात आला आहे. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर … Read more

वकील महाशयांनी चक्क बनियनवरच केली युक्तीवादाला सुरुवात, पुढं असं काही झालं..

जयपूर । ‘वर्क फ्रॉम होम’ या सवलतीचा काहीजण कसा अर्थ लावतायत याचं एक भन्नाट आणि विचित्र उदाहरण राजस्थानमध्ये पाहायला मिळालं. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक केसेसची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सनं करण्याची परवानगी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांनी दिली आहे. अशाच एका केसमध्ये सुनावणीसाठी राजस्थान हायकोर्टातून एका वकिलाला कॉन्फरन्स कॉल लावला गेला. तर वकील महाशय चक्क बनियनमध्येच युक्तीवादाला उभे राहिले. … Read more

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होम, सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउनची अंमलबजावणी केली गेली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घरातच असतात. घरातच असल्याने कंडोम, गोळ्या आणि एडल्ट सेक्स टॉयजच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सेक्सुअल वेलनेस उद्योगाच्या उत्पन्नामध्ये २४-२८ टक्के वाढ झालेली आहे. यामुळे केवळ लैंगिक आरोग्यावरच केंद्रित असलेल्या काही … Read more

न्युज अँकर घरातून करत होती काम, टिव्हीवर लाईव्ह असताना पतीने केले असे काही..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करायला भाग पाडले आहे. वर्क फ्रॉम होम वेळी, आपली सर्वात मोठी समस्या घरातल्या डिस्टरबंसमुळे होते. घरी, असे काहीतरी घडटच असते जे आपले लक्ष विचलित करते. याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जेव्हा कोरोना लॉकडाऊनमध्ये घरातूनच TV रिपोर्टिंग करत असलेल्या मुलीचे … Read more

Recipe: Work Form home मध्ये शरीराला ताजेतवाने करेल तुळशी चहा,कृती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे.वर्क फ्रॉम होममुळे बर्‍याच लोकांसाठी शारीरिक तंदुरुस्ती टिकवणे हे एक आव्हान बनलं आहे. घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लोक दिवसातून बर्‍याच वेळा चहा घेत असतात. जास्त चहाचे सेवन करणे आपल्या आरोग्यास हानिकारकदेखील ठरू शकते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी … Read more

वर्क फ्रॉम होममुळे येतोय जास्त ताण ? वापरा ‘या’ ५ टिप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन झाला आहे. यासह बॉलिवूड सेलिब्रिटी, डॉक्टर यांच्यासह सरकारही लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करीत आहे. जेणेकरून या साथीची साखळी तोडता येईल. क्वारंटाइन ठेवण्यात आल्यामुळे आपल्याला घरातूनच काम करावे लागतंय अशा परिस्थितीत आपल्यावर खूप दबाव असू शकतो, कारण सर्व गोष्टींचे वेळापत्रक, टाइम टेबल इत्यादीसारख्या अचानक गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक … Read more