पियुषजी, आडमुठेपणा सोडून सहकार्य करा! रेल्वेमंत्र्यांना थोरातांचा सबुरीचा सल्ला

मुंबई । स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील महाविकास आघाडीतील नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात ट्वीटर वॉर पाहायला मिळतं आहे. दरम्यान आता या ट्विटर वॉरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एंट्री मारली आहे. ”परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे … Read more

ठाकरे सरकारवर ताशेरे ओढणार्‍या योगी आदित्यनाथांना रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच ट्विटर वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथापि महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला दूषणे दिली आहेत. योगी यांनी महाराष्ट्र सरकारवर कामगारांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना काम न देऊन सर्व काही सोडून जाण्यास भाग पाडले असे त्यांनी म्हंटले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येताना… राज यांचे योगींना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई । यापुढे महाराष्ट्राला किंवा इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. योगी यांनी या नव्या नियमांसंदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिली होती. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले … Read more

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र ATS कडून मुंबईत अटक

मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र एटीएस पथकाने शनिवारी रात्री अटक केली आहे. कामरान अमीन खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मुंबईतील चुनाभट्टी भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला … Read more

राजकारण सुरु! राजस्थान सरकारनं पाठवलं यूपी सरकारला विद्यार्थ्यांना बसनं सोडण्याचं बिल

लखनऊ । संपूर्ण देश कोरोनाच्या संकटतात असताना याही काळात राजकीय पक्षांनी राजकारणाला विश्रांती दिली नाही. लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या नेतृत्वातील राजस्थान सरकारने उत्तर प्रदेशात बसेसद्वारे सोडले. राजस्थान सरकारने याचे ३६ लाख ३६ हजार इतके भाडे आकारले. तर उत्तर प्रदेश सरकारने हे भाडे शुक्रवारी चुकते केले. दरम्यान, आता या बिल प्रकरणावरून … Read more

योगी आदित्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. … Read more

हवं तर काँग्रेसनं पाठवलेल्या बसेसला भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी ‘त्या’ बस सोडा

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी काँग्रेसकडून सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी आदित्यनाथ सरकारमध्ये खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेऊन योगी सरकारवर हल्ला चढवला. ”ही वेळ राजकारणाची नसून आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. … Read more

योगीजी, तुमच्या एका निर्णयावर लाखो कामगारांचं जीवन अवलंबून असताना तुम्ही असं वागू नका – सृष्टी के

गाझियाबादमधील श्रमिक रेल्वेच्या बुकींगसाठीची गर्दी, स्थलांतरित कामगारांचे विविध ठिकाणचे फोटो पाहता त्यांच्या अवस्थेचे चित्रण करत आहेत. राज्यातील कामगारांची ही अवस्था पाहता उत्तरप्रदेश सरकारवर लोकांमधून द्वेष व्यक्त केला जात आहे.

घरी परतण्याच्या तिकीट नोंदणीसाठी गाझियाबादमध्ये लोकांची झुंबड, गर्दी नियंत्रणाबाहेर..!!

घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंग करायला आलेल्या हजारो लोकांनी गाझियाबादमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला आहे.

मजुरांच्या वाहनाला अपघात; २४ जण जागीच ठार

औरैया । आज पहाटे उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आपापल्या घरी निघालेल्या मजुरांच्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पहाटे ३:३० वाजता झालेल्या या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते २० जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात … Read more