औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी निबंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. या ठिकाणी शासनाने निर्बंध लावलेले आहेत. निर्बंध न पाळणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेले नियम न पाहणाऱ्या वर आणि दुपारी 4 नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोना महामारीच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली. यावेळी औरंगाबाद महापालिका आरोग्य विभाग जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे लसीकरण काही काळ बंद आहे परंतु लवकरच लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात येईल. यासाठी प्रयत्न केले जातील. लसीकरण मोहीमसाठी नियोजन करण्याची गरज आहे. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.