व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Credit Card चा पुरेपूर फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card :इंटरनेटमुळे आजकाल बँकांच्या विविध सेवांचा लाभ घेणे खूप सोपे झाले आहे. अशातच इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा ट्रेंड देखील वाढतो आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्डचे महत्त्वही खूप वाढले आहे. मात्र अशी वस्तुस्थिती देखील आहे की, प्रत्येक जण आपल्या क्रेडिट कार्डचा पूर्ण फायदा घेत नाही. कारण त्यांना आपल्या क्रेडिट कार्ड द्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती नसते.

जर युझरने Credit Card द्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या सर्व ऑफर आणि सेवांचा वापर केला तर त्याला भरपूर पैसे वाचवता येतील. क्रेडिट कार्ड वापरून युझर्सना ‘Buy Now, Pay Later’ या सुविधेचा लाभ घेता येते. इतकेच नाही तर कंपन्यांकडून अनेक ऑफर्स, डिस्काउंट आणि रिवॉर्ड पॉइंट्स देखील दिले जातात.

Credit Card वापरणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत 'या' चुका, अन्यथा होईल मोठे  नुकसान Hello Maharashtra

‘Buy Now, Pay Later’

‘Buy Now, Pay Later’ या सुविधेमध्ये ग्राहकांना आधी खरेदी करण्याची आणि नंतर पैसे देण्याची परवानगी मिळते. विशेष म्हणजे या सुविधेसाठी फारच कमी व्याज आकारले आहे, तसेच काही प्लॅटफॉर्म वर फ्री सर्व्हिस देखील मिळते. Credit Card द्वारे करण्यात येणाऱ्या खरेदीवर जर बँकेकडून जास्त व्याज आकारला जात असेल, तर आपण ‘Buy Now, Pay Later’ या सुविधेचा लाभ घ्यावा. कारण याद्वारे आपल्याला कमी व्याज द्यावे लागेल. तसेच आपल्याला कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्स देखील मिळतील. जे आपल्याला पुढच्या खरेदीसाठी वापरता येतील.

खरेदीवर रिवॉर्ड्स

सुपरमार्केट, पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स कडून क्रेडिट कार्डने पैसे दिल्यावर रिवॉर्ड्स पॉईंट्स मिळतात. जर आपण जिथून रिवॉर्ड्स मिळत आहेत तिथून खरेदी केली तर आपले बरेच पैसे वाचतील. उदाहरणार्थ, समजा काही सुपरमार्केटमध्ये Credit Card द्वारे एका महिन्यात 5,000 रुपयांच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळत असेल. तर अशा प्रकारे, एका महिन्यात 250 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच एका वर्षानंतर आपल्याला ते कॅशमध्ये देखील रिडीम करता येतील. आपण ते रिडीम केले नाही तर आपल्याला आणखी ऑफर मिळतील. त्यामुळे आपल्याला फायदाच मिळेल.

12 Best Credit Cards For Fresh Grads To Build Credit Score In Malaysia

मर्चंट स्‍पेशल डिस्‍काउंट

काही ठिकाणी Credit Card वापरून खरेदीसाठी सवलत देखील उपलब्ध मिळते. क्रेडिट कार्ड देणारी बँक आपल्या वेबसाइटवर या सवलतींची माहिती देत ​​असते. ही सवलत 5 ते 20 टक्क्यापर्यंत असू शकते. म्हणूनच खरेदी कराण्याआधी आपल्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डवर कोणती सवलत तर दिली जात नाही ना हे तपासा.

क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्याचे फायदे

क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका किंवा कंपन्या आपल्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर काही विशेष फायदेही देतात. जसे की प्रॉडक्ट्सवरील इन्शुरन्स कव्हर सारख्या विशेष फायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, अशा कोणत्याही सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी त्याच्या अटी आणि नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

Credit Card Applying Process | Steps to acquire a credit card | | Need to  Know best time to apply and more

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/credit-card.html

हे पण वाचा : 

Business ideas : पांढर्‍या चंदनाची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!

Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली, नवीन दर तपासा

Credit Card वापरणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान

Gold Price Today : सोन्यामध्ये तेजी तर चांदीही वधारली, आजचे दर जाणून घ्या

Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद