हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील DCB Bank ने शुक्रवारी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता DCB बँकेचे कर्ज महागणार आहे. खरं तर, बँकेकडून आपल्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.23 टक्क्यांनी वाढ केली गेली आहे. हे नवीन व्याजदर 6 जूनपासून लागू होणार आहेत. हे लक्षात घ्या कि DCB बँक ही खाजगी क्षेत्रातील मुंबईस्थित बँक आहे.
या वाढीमुळे आता बँकेच्या टर्म लोनवरील EMI मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे लक्षात असू द्यात कि, बहुतेक कंझ्युमर लोन हे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट वर आधारित असतात. त्यामुळे MCLR मध्ये वाढ झाल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो तसेच होम लोन देखील महागतील. DCB Bank
DCB Bank ने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये सांगितले की, 6 जूनपासून एक वर्षाच्या MCLR वर 9.46% व्याज द्यावा लागेल तर त्यावरील सध्याचा दर हा 9.23% आहे. तसेच तीन महिन्यांच्या आणि सहा महिन्यांच्या MCLR वरील व्याजदर 8.98% आणि 9.18% वरून अनुक्रमे 9.21% आणि 9.41% पर्यंत वाढवले गेले आहेत. त्याच बरोबर एका महिन्याच्या MCLR वरील व्याजदर 8.28% वरून 8.51% करण्यात आला आहे.
MCLR काय आहे???
MCLR हे बँकांसाठी कर्जाचा व्याजदर ठरवण्यात येणारी RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे. 1 एप्रिल 2016 पासून RBI ने देशभरात MCLR लागू केला. त्यापूर्वी सर्व बँका ग्राहकांना बेस रेटच्या आधारे व्याजदर देत असत. मात्र एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता बँकांद्वारे MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात झाली तर त्याचा परिणाम हा बँकेच्या नवीन आणि सध्याच्या कर्जदारांवर देखील होतो. DCB Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dcbbank.com/loans
हे पण वाचा :
Aadhaar Update : आपल्या आधार कार्डशी किती सिम कार्ड लिंक्ड आहेत ??? अशा प्रकारे तपासा
Business Idea : सेंद्रिय खतांचा व्यवसाय करून मिळवा लाखो रुपये !!!
PAN-Aadhaar Link : आता 30 जूनपर्यंत पॅन-आधार लिंक केले नाही तर द्यावा लागणार दुप्पट दंड !!!
PM Kisan: 11वा हप्ता चुकलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! सरकारने e-KYC ची मुदत वाढवली
Multibagger stock : अवघ्या काही महिन्यांत ‘या’ 5 पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला 2700% रिटर्न !!!