तलाठी भरतीसाठी तुमच्या जिल्ह्यात किती जागा? पहा एका Click वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाकडून तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) नोटिफिकेशन जारी करण्यात आली असून तब्बल ४१२२ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. जिल्यानुसार आणि झोननुसार जागांचे वाटप कऱण्यात आलं आहे. त्यानुसार आज आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात नेमक्या किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.

पुणे विभाग – 746 जागा

Pune (पुणे) – 339 जागा
Satara (सातारा) – 77 जागा
Sangali (सांगली) – 90 जागा
Solapur (सोलापूर) – 174 जागा
Kolhapur (कोल्हापूर) – 66 जागा

कोकण विभाग – 731 जागा

Mumbai City (मुंबई शहर) – 19 जागा
Mumbai Suburban (मुंबई उपनगर) – 39 जागा
Thane (ठाणे) – 83 जागा
Palghar (पालघर) – 157 जागा (Talathi Bharti 2023)
Raigad (रायगड) – 172 जागा
Ratngairi (रत्नागिरी) – 142 जागा
Sindhudurg (सिंधुदूर्ग) – 119 जागा

नाशिक विभाग – 1035 जागा

Nashik (नाशिक) – 252 जागा
Dhule (धुळे) – 233 जागा
Nandurbar (नंदुरबार) – 40 जागा
Jalgaon (जळगाव) – 198 जागा
Ahamednagar (अहमदनगर) – 312 जागा

अमरावती विभाग -183 जागा

Amravati (अमरावती) – 46 जागा
Akola (अकोला) – 19 जागा (Talathi Bharti 2023)
Yavatmal (यवतमाळ) – 77 जागा
Washim (वाशीम) – 10 जागा
Buldhana (बुलढाणा) – 31 जागा

नागपूर विभाग – 580 जागा

Nagpur (नागपूर) – 125 जागा
Wardha (वर्धा) – 63 जागा
Bhandara (भंडारा) – 47 जागा
Gondia (गोंदिया) – 60 जागा
Chandrapur (चंद्रपूर) – 151 जागा
Gadchiroli (गडचिरोली) – 134 जागा

औरंगाबाद विभाग – 847 जागा

Aurangabad (औरंगाबाद) – 157 जागा
Jalna (जालना) – 95 जागा
Parbhani (परभणी) – 84 जागा
Hingoli (हिंगोली) – 68 जागा (Talathi Bharti 2023)
Nanded (नांदेड) – 119 जागा
Latur (लातूर) – 50 जागा
Beed (बीड) – 164 जागा
Osmanabad (उस्मानाबाद) – 110 जागा

तलाठी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांदरम्यान असावे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.