अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्यात गुंतला तालिबान, अर्थमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री केले नियुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान एका बाजूने पंजशीरमध्ये नॉदर्न अलायन्सशी लढत आहे. तर दुसरीकडे आपल्या सरकारची रूपरेषा तयार करत आहे. तालिबान्यांनी मंगळवारी काळजीवाहू अर्थमंत्री, शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांची नावे अंतिम केली.

Pajhwok अफगान न्यूजनुसार, तालिबानने सखउल्लाहला शिक्षण प्रमुख म्हणून, अब्दुल बाकीला उच्च शिक्षणाचे कार्यवाहक प्रमुख म्हणून, सदर इब्राहिमला कार्यवाहक गृहमंत्री म्हणून, गुल आगाला अर्थमंत्री म्हणून, मुल्ला शिरीनला काबूलचे गव्हर्नर म्हणून तर हमदुल्ला नोमानी काबुलचा महापौर आणि नजीबुल्लाह गुप्तचर प्रमुख नियुक्त केले.

यापूर्वी तालिबानने आपला प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदला संस्कृती आणि माहिती मंत्री म्हणून नियुक्त केले होते. मुजाहिद तिथेच आहे, त्याने एक दिवस आधीच माध्यमांना संबोधित करताना तालिबान सरकार कसे असेल हे सांगितले.

तालिबानने सोमवारी सांगितले की, जोपर्यंत काबुलमध्ये एकही अमेरिकन सैनिक असणार नाही तोपर्यंत तालिबान सरकार स्थापन करणार नाही. एका रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची 31 ऑगस्टची मुदत वाढवू शकतात.

सालेहचा दावा – तालिबान अंदराब मध्ये अन्न पुरवठा बंद करत आहे
दरम्यान, अफगाणिस्तानचे ‘काळजीवाहू’ अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी उत्तर बागलाण प्रांतातील अंदराब खोऱ्यातील भीषण “मानवी परिस्थिती” बद्दल माहिती दिली आहे. तालिबानने येथे मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे सालेह म्हणाले. तालिबान लढाऊंनी खाण्यापिण्याचा पुरवठा बंद केला आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या जाऊ देत नाहीत. आदल्या दिवशी अंदराब परिसरात तालिबान आणि प्रतिरोधक दलांमध्ये जोरदार चकमक झाली.

अमरुल्ला सालेहने ट्वीट केले- “तालिबानने अंदराब व्हॅलीमध्ये अन्न आणि इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. येथील मानवी स्थिती बिकट बनली आहे. हजारो महिला आणि मुले डोंगरावर पळून गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तालिबान मुले आणि वृद्धांचे अपहरण करत आहे. आता मुलांना ढाल म्हणून वापरले जात आहे. घरे शोधण्यासाठी मुलांनाही ढाल बनवले जात आहे.”

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि स्वयंघोषित काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह आणि दिवंगत वॉर लॉर्ड अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद सध्या पंजशीरमध्येच आहेत, जे तालिबानला चांगलीच टक्कर देत आहेत. आपण देश सोडून पळून जाणार नाही, असे सालेहने याआधीच स्पष्ट केले आहे. त्यांनी तालिबानपुढे नतमस्तक होण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले ,”एक दिवस फक्त अल्लाहच माझा आत्मा येथून बाहेर काढेल, पण तरीही माझे अवशेष या मातीत सापडतील.”

Leave a Comment