हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौऱ्यावर येणार आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प यांचा भारत दौरा नियोजित असून दिल्ली आणि गुजरातमधील महत्त्वाच्या ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. एव्हाना ट्रम्प यांची सात समुद्र पार करुन भारताकडे यायची तयारी पूर्ण झाली असणार आहे. ट्रम्प यांच्या येण्याची उत्सुकता जितकी राजकीय लोकांना आहे तितकीच सामान्य भारतीय नागरिकांनासुद्धा असल्याचं पाहायला मिळत आहे.
तमिळनाडूमधील एका कलाकाराने कलिंगडावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिकृती कोरली आहे. यासोबतच नरेंद्र मोदी आणि ताजमहाल या प्रतिमाही कलिंगडावर या कलाकाराने कोरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी रस्ते सुशोभित करण्यात आले आहेत, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत सोबतच माहिती देणारे आणि मोदी, ट्रम्प यांची प्रतिमा उजळवणारे मोठमोठाले होर्डिंग्जही लावण्यात आले आहेत.नी अथक परिश्रम घेतले.
थेनी, तमिलनाडु: ट्रंप के भारत दौरे पर फ्रूट कार्विंग में माहिर कलाकार एम. एलंचेजियन ने तरबूज पर अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप और प्रधानमंत्री मोदी की खास तस्वीर उकेरी। pic.twitter.com/wHhSZiwUOB
— ANI_HindiNews (@AHindinews) February 22, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.