‘तारक मेहता..’मधील बबितावर अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Munmun Datta
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीता अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्ता मोठ्या अडचणीत सापडली आहे. गेल्या रविवारी मुनमुनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने जातीवाचक शब्दांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर यासंदर्भात अपमानजनक वक्तव्य केले आहे. यामुळे तिच्या विरोधात आता हरियाणामधील हांसीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी तिला कधीही अटक होण्याची शक्यता दिसत आहे.

मुनमुनने शेअर केलेल्या व्हिडीओत एका जातीवाचक शब्दाचा वापर तिच्याकडून करण्यात आला होता. या व्हडिओत ती म्हणाली होती कि, ‘मी युट्यूबवर येणार आहे आणि मला चांगले दिसायचे आहे. मला कुण्या ***** सारखे दिसायचे नाही,’ असे मुनमुन या व्हिडीओत बोलताना दिसली. तिचा हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अगदी क्षणातच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे लोकांनी तिला चांगलेच सुनावले होते.

https://twitter.com/HansrajMeena/status/1391711127835340801

दरम्यान अनेकांनी तिच्यावर कारवाई करा अशी मागणीही केली होती. त्यानंतर आता नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कालसन यांनी मुनमुनवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक झाल्यास तिला जामीन देखील मिळणार नाही, अशी शक्यता नाकारता येत आहे.

ह्या व्हिडीओवरील लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्यानंतर हे प्रकरण आपल्या चांगलेच अंगलट येण्याची चिन्हे मुनमुनला जाणवली होती. यामुळे मुनमुनने लोकांची जाहीर माफी मागितली होती. या माफीनाम्यात तिने लिहिले होते कि, व्हिडीओतील एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढला गेला. कुणाचाही अपमान करण्याचा, त्यांना धमकावण्याचा, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.

https://www.instagram.com/p/COrzJcbnPZL/?utm_source=ig_web_copy_link

भाषेच्या अडचणीमुळे मी तो शब्द चुकीच्या अर्थाने घेतला. पण माझी चूक लक्षात आणून देताच मी तो शब्द मागे घेतला. माझ्या मनात प्रत्येक जातीधर्माबद्दल समाजाबद्दल पूर्ण आदर आहे. अजाणतेपणी झालेल्या या चुकीसाठी मी सर्वांची माफी मागते. मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगीरी व्यक्त करते. मात्र तरीही आता तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून कोणत्याही क्षणी तिला अटक होण्याची शक्यता आहे.