भारत बायोटेक पुण्यात तयार करणार आहे कोवॅक्सिन, ऑगस्टच्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोवॅक्सिनची (Covaxin) निर्मिती करणार्‍या भारत बायोटेकची उपकंपनी बायोवेट प्रायव्हेट लिमिटेडने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पुण्यातील मांजरी येथील एका प्लांटमध्ये लस उत्पादन ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण कार्यान्वित होईल. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्लांटला भेट दिली. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच बायोवेटला कोवॅक्सिनच्या प्रोडक्शनसाठी मांजरी येथील 12 हेक्टर भूखंडावर आधीच तयार केलेला लस उत्पादन प्लांट ताब्यात घेण्याची परवानगी दिली.

राव म्हणाले, “या प्लांटची पायाभूत सुविधा सुसज्ज स्थितीत आहे. कंपनीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कार्यक्षम आहे आणि एक समर्पित टीम आहे. मला असे वाटत नाही की, प्रोडक्शन सुरू करण्यासाठी एखाद्या प्रकारच्या फ्रेमवर्कची आवश्यकता असेल. येथे सर्वकाही व्यवस्थित केलेले आहे.”

राव म्हणाले की,”बायोवेट अधिकारी प्लांटमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करत आहेत. बायोट अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, ते एका आठवड्यात मूल्यांकन काम पूर्ण करतील.”

राव म्हणाले,”परवाना, मंजुरी, नियामक निर्णयांच्या बाबतीत कंपनीला केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून ज्या प्रकारचे सहकार्य मिळत आहे, त्यामुळे त्यांना विश्वास आहे की, ऑगस्टच्या अखेरीस हा प्लांट पूर्णपणे कार्यरत होईल आणि लसीची पहिली खेप बाहेर येईल.”

अलीकडेच हायकोर्टाने म्हटले होते की,” कोविड -19 ची परिस्थिती लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्लांट बायोवेटला द्यावा.” यापूर्वी हा प्रकल्प अमेरिकेतील मल्टीनेशनल फार्मास्युटिकल कंपनी मर्क अँड कंपनीची सहाय्यक कंपनी इंटरव्हिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वापरत असे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment