कराड प्रतिनिधी | विशाल पाटील
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज बुधवार दिनांक दि. 10 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 8 जागा बिनविरोध झाल्या तर यापूर्वी 3 बिनविरोध झाल्या असल्याने जिल्हा बँकेत एकूण 11 जागा बिनविरोध झाल्या असून आता 10 जागांसाठी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा बँकेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि ऍड. उदयसिंह पाटील यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून जाणार आहे.
कै. विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य ऍड उदयसिंह पाटील यांच्याविरोधात कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल झाल्या दिवसापासून कराड सोसायटी गटातील हे दोन्ही उमेदवार काय करणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सहकार मंत्री हे अर्ज माघारी काढून घेतील अशी आशा केली जात होती. मात्र अनेकदा अर्ज माघारी काढून घेऊन समझोता करणाऱ्या सहकार मंत्र्यांनी यावेळी टशन द्यायची असे ठरवले आहे.
सातारा जिल्ह्यात 10 जागांसाठी दुरंगी लढत होणार आहेत. मात्र यामध्ये कराड सोसायटी गटाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार हे निश्चित आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केल्यापासून सर्वपक्षीय मतदारांना भेटत निवडणूक लढाईची हे निश्चित केले आहे. तर दुसरीकडे ऍड. उदयसिंह पाटील यांनीही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सोसायटी गटातूनच लागणार हे निश्चित केले होते. त्यामुळे आता सातारा जिल्हा बॅंकेचे मुख्य लढत ही कराड सोसायटी गटातील असून येथे टशन पाहायला मिळणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक 2021
???? 11 जागा बिनविरोध ????
????बिनविरोध निवडून आलेले संचालक
???? खरेदी विक्री – आमदार मकरंद पाटील
???? कृषी प्रक्रिया – शिवरूपराजे खर्डेकर
???? गृहनिर्माण – खासदार उदयनराजे भोसले
???? भटक्या विमुक्त जमाती – लहू जाधव
???? अनुसूचित जाती जमाती – सुरेश सावंत
???? औद्योगिक व विणकर – अनिल देसाई बिनविरोध
प्राथमिक कृषी पतपुरवठा गट मतदारसंघ
???? सातारा – आमदार शिवेंद्रराजे भोसले
???? फलटण – रामराजे नाईक-निंबाळकर
???? खंडाळा – दत्तानाना ढमाळ
???? वाई – नितीन पाटील महाबळेश्वर – राजेंद्र राजपुरे