TATA च्या ‘या’ 2 गाड्यांमध्ये दिले जाणार CNG किट, इलेक्ट्रिक व्हर्जनही लवकरच होणार लॉन्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA ची कार वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता टाटा अल्ट्रोझ हॅचबॅक आणि पंच मायक्रो एसयूव्ही मॉडेल लाइनअप सीएनजी व्हेरिएंट आणि त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनसहीत लाँच करण्यात येणार आहे. या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये या दोन्ही कारच्या CNG व्हर्जन्सची एक झलक पहायला मिळाली आहे. हे लक्षात घ्या कि, बूट स्पेस वाचवण्यासाठी या कंपनीकडून या नवीन कारच्या मागील बाजूला एक नवीन ड्युअल सिलेंडर लेआउट सेटअप देखील दिला गेला आहे. या दोन्ही सिलेंडरची क्षमता 30 लिटर इतकी असेल. टाटाच्या या नवीन सीएनजी कारमध्ये सिंगल एडवांस्ड ECU (इंजिन कंट्रोल युनिट) आणि डायरेक्ट स्टेट सीएनजी देण्यात आले आहे.

Upcoming Tata Altroz EV Car Specifications and Price | CarTrade

याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, या नवीन मॉडेलमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट लीकेज डिटेक्शन टेक्नॉलॉजी दिली गेली आहे, जी गॅस गळती झाल्यास पेट्रोलवर स्विच करण्यास सक्षम असेल. तसेच Tata Altroz ​​CNG आणि पंच CNG मधील पॉवरट्रेन सेटअपमध्ये 1.2L पेट्रोल इंजिनसहीत फॅक्टरी-फिटेड CNG किटचा समावेश केला गेला आहे. हे 77PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच ट्रान्समिशन ड्युटीसाठी यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील दिला जाईल.

TATA Launches Micro SUV Punch in India: Check Price, Features,  Specifications, Variants, Mileage

असे असतील फीचर्स

फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, या नवीन CNG व्हेरिएंटमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसहीत 7-इंच इंफोटेनमेंट सिस्टीम, लेथरेट सीट अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिक सनरूफ, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हाइट एडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि प्रोजेक्टर देण्यात आले आहेत.

Tata Altroz EV - Gadi Campus

ऑटो एक्सपोमध्ये पहायला मिळाली झलक

हे लक्षात घ्या कि, टाटा पंच EV सणासुदीच्या काळात रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. हे मॉडेल अल्फा प्लॅटफॉर्मच्या नवीन व्हर्जनवर आधारित असेल. तसेच ते टाटाच्या Ziptron पॉवरट्रेनसहीत दिले जाऊ शकते. ही नवीन सिग्मा पंच EV त्याच्या ICE-व्हर्जनपेक्षा जास्त हलकी, आणखी प्रशस्त आणि एनर्जी सफीशिएंट असेल.

Tata Punch Price - Images, Colours & Reviews - CarWale

Nexon EV प्रमाणेच इलेक्ट्रिक मिनी SUV मध्येही दोन बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. या इलेक्ट्रिक व्हेरियंटला त्याच्या ICE मॉडेलपासून वेगळे करण्यासाठी बाहेरून याला थोडे वेगळे बंपर, नवीन चाके आणि रंगीत एक्सेंट दिले जाऊ शकतील. Tata Altroz ​​EV, जी पुढील वर्षी येण्याची अपेक्षा आहे, त्याच्या पॉवरट्रेन आणि काही डिझाइनमध्ये बदल झालेले पहायला मिळतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://cars.tatamotors.com/cars/altroz

हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक