Tata Capital IPO : टाटा समूहाचा आणखी एक IPO येणार; गुंतवणूकदारांना मोठी संधी

Tata Capital IPO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. देशातील नामांकित उद्योग समूह असलेला टाटा समूह आपला नवा आयपीओ (Tata Capital IPO) बाजारात लाँच करणार आहे. हा आयपीओ Tata Capital चा असेल. १५,००० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या आयपीओसाठी टाटा कपिटल्सने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे कागदपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती समोर येत आहे. कंपनीने कागदपत्रे गोपनीय प्री-फाइलिंग मार्गाने बाजार नियामकाकडे दाखल केली आहेत. या धोरणात्मक निर्णयासह, टाटा कॅपिटल टाटा प्ले, ओयो, स्विगी, विशाल मेगा मार्ट, इंदिरा आयव्हीएफ, क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस आणि फिजिक्सवाल्लाह नंतर आठवी मोठी भारतीय कंपनी बनली आहे.

टाटा ग्रुपची प्रमुख गुंतवणूक धारक कंपनी टाटा सन्सकडे या वर्षी ३१ मार्चपर्यंत टाटा कॅपिटलमध्ये थेट ९२.८३% हिस्सा आहे. उर्वरित शेअर्स इतर समूह संस्था आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) कडे आहेत. टाटा कॅपिटलच्या बोर्डाने फेब्रुवारीमध्ये IPO लाँच करण्यापूर्वी 1,504 कोटी रुपये उभारण्यासाठी राइट्स इश्यू मंजूर केला होता. प्रस्तावित आयपीओमध्ये २३० दशलक्ष शेअर्सचा नवीन इश्यू असेल.

सल्लागार म्हणून १० गुंतवणूक बँकांची नियुक्ती- Tata Capital IPO

टाटा कॅपिटलने त्यांच्या आगामी IPO साठी (Tata Capital IPO) सल्लागार म्हणून १० गुंतवणूक बँकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी, जेपी मॉर्गन, अ‍ॅक्सिस कॅपिटल, HSBC सिक्युरिटीज, ICICI सिक्युरिटीज, IIFL कॅपिटल, BNP परिबास, SBI कॅपिटल आणि HDFC बँक या बँकांचा समावेश आहे. “गोपनीय प्री-फाइलिंग मार्गाने बाजार नियामकाकडे मसुदा कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. हा इश्यू प्राथमिक आणि दुय्यम शेअर्सच्या एकत्रित इश्यूचा असेल, टाटा सन्स आणि गुंतवणूकदार आयएफसी हे स्टेक विकतील, ज्यामध्ये टाटा सन्सचा मोठा सहभाग असेल,.