हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा समूह (Tata Group) असलेला टाटा ग्रुप अगदी सुईपासून ते विमानापर्यंत सर्व काही बनवतो. देशात टाटा समूहाला मोठा मान आणि सन्मान आहे. आता टाटा समूह मोबाईल क्षेत्रात एंट्री करणार आहे. त्यासाठी ते प्रसिद्ध चिनी ब्रँड Vivo सोबत पार्टनरशिप करण्याची शक्यता आहे. खरं तर टाटा ग्रुप यापूर्वीच हँडसेट आणि मोबाईल नेटवर्क क्षेत्रात उतरला होता, मात्र आता स्मार्टफोन बनवण्याची कंपनीची योजना आहे. जर टाटाचा विवो सोबतचा हा करार निश्चित झाला तर या चिनी कंपनीत टाटाचा 51 टक्के हिस्सा असेल, म्हणजेच त्याचे नियंत्रण टाटा ग्रुपकडे राहील.
भारत सरकारने सर्व चिनी कंपन्यांवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरु केली आहे. चीनच्या लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड विवोने आपला मोठा हिस्सा भारतीय कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि याबाबत टाटा समूहाशी चर्चा सुरू आहे. Vivo एका भारतीय कंपनीच्या मदतीने उत्पादन आणि वितरण करण्याची तयारी करत आहे. टाटा आणि विवो मध्ये याबाबत प्राथमिक स्तरावर बोलणी झाली आहे. आता वीवो कंपनीच्या मूल्यांकनावर हे प्रकरण आले आहे. टाटाने आपल्याकडून वीवी कंपनीचे मूल्यांकन केले आहे. परंतु वीवोला त्यापेक्षा अधिक मूल्यांकन हवे आहे. टाटा कंपनी या करारासाठी उत्सुक आहे. परंतु अद्याप काहीच निश्चित झाले नाही.
दरम्यान, मागील वर्षी टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही देशात आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. कंपनीने तैवानच्या विस्ट्रॉनला $125 दशलक्षला विकत घेतले होते. आता कंपनी ऍपलच्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पेगाट्रॉनशी त्याच्या चेन्नईस्थित आयफोन उत्पादन कंपनीतील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. त्यातच जर विवो सोबत सुद्धा टाटा ची पार्टनरशिप यशस्वी झाली तर मोबाईल क्षेत्रात टाटा समूहाचा दबदबा आगामी काळात पाहायला मिळू शकेल.