Sunday, June 4, 2023

स्क्रॅपिंग सेंटर उभे करण्यासाठी टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करार

नवी दिल्ली । टाटा मोटर्सने महाराष्ट्रात रजिस्टर्ड वाहन स्क्रॅपिंग सुविधा सुरू करण्यासाठी राज्य सरकारशी करार केला आहे. या अंतर्गत भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी राज्यात scrap center उभारणार आहे. या सेंटरमध्ये वर्षभरात मुदत पूर्ण झालेल्या सुमारे 35 हजार वाहनांना स्क्रॅप करता येणार आहे.

टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश बाग म्हणाले, “हा सर्कुलर अर्थव्यवस्थेच्या स्थापनेला प्रोत्साहन देईल आणि पूर्व-शाश्वत वाहतुकीच्या क्षेत्रात आमचे नेतृत्व स्थान आणखी मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल. देशभरात स्क्रॅपिंग सुविधा उभारण्याच्या या उपक्रमात धोरण निर्मात्यांसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे आणि भारताच्या वाहतूक क्षेत्रासाठी योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. टाटा मोटर्सने माहिती दिली की राज्याचे उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग स्क्रॅपिंग सेंटरच्या स्थापनेसाठी आवश्यक मंजुरी देण्यासाठी पुढे आले आहेत.

स्क्रॅपिंगवर तुम्हाला नवीन वाहन खरेदीवर सूट मिळू शकेल
स्क्रॅपिंग पॉलिसी अंतर्गत सरकार जुनी वाहने स्क्रॅप करून नवीन वाहने खरेदी करण्यावर टॅक्समध्ये सूट देण्याचा विचार करत आहे. अलीकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही ऑटो क्षेत्राला जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग सर्टिफिकेटच्या आधारे अतिरिक्त 5 टक्के सूट देण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे सरकारला मदत होईल. वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे देशातील ऑटोची मागणी वाढेल.