Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Tata Nexon EV Jet) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Tata Motors ने भारतात Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च केलं आहे. Tata Nexon EV जेट एडिशन XZ+ लक्स प्राइम जेट व्हेरियंटची किंमत 17.50 लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त Tata Nexon EV Jet Edition XZ+ Lux MAX Jet आणि XZ+ Lux MAX Jet AC FC WMU या आणखी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल, ज्यांची किंमत अनुक्रमे 19.54 लाख आणि रुपये 20.04 लाख आहे. Tata Nexon EV Jet Edition चे लाँचिंग Tata Motors ने नवीन Tata Safari Jet Edition, Tata Harrier Jet Edition आणि Tata Nexon Jet Edition ला भारतीय ग्राहकांसाठी अपग्रेड केलेल्या वैशिष्ठ्यांसह आणि किमतींसह लाँच केल्याच्या काही दिवसांनंतर करण्यात आले आहे.

Tata Nexon EV Jet

आकर्षक कलरटोन-

Safari, Nexon आणि Harrier प्रमाणेच, Tata Nexon EV जेट एडिशन शानदार इंटेरिअर सह ‘बिझनेस जेट्स’ कडून प्रेरणा घेते. याशिवाय नवीन जेट एडिशन एका (Tata Nexon EV Jet) अनोख्या रंगात उपलब्ध असेल. स्टारलाईट, ब्रॉन्झ बॉडी आणि प्लॅटिनम सिल्व्हर रूफचे ड्युअल-टोन कॉम्बिनेशन. यात पुढील आणि मागील बाजूस जेट ब्लॅक अलॉय व्हील्स आणि सिल्व्हर स्किड प्लेट्स देखील मिळतात.

Tata Nexon EV Jet

अन्य वैशिष्ट्ये – (Tata Nexon EV Jet)

याशिवाय, इंटिरिअरला (Tata Nexon EV Jet) ड्युअल-टोन ऑयस्टर व्हाइट आणि ग्रॅनाइट ब्लॅक मिळतो. टेक्नो-स्टील ब्रॉन्झ फिनिश मिड-पॅड हे इन्स्ट्रुमेंट पॅनेलवरील आकर्षणाचे केंद्र आहे. सोबतच दरवाजे आणि फ्लोअर कन्सोलवर ब्रॉन्झ अॅक्सेंट, समोरच्या हेडरेस्टवर जेट एम्ब्रॉयडरी आणि ब्रॉन्झ धाग्यातील सीटवर डेको शिलाई पाहायला मिळेल. Tata Nexon EV जेट व्हेरियंटला नियमित EV मॉडेलच्या XZ+ ट्रिम्सप्रमाणेच यांत्रिक आणि बॅटरी क्षमता मिळत राहील.

हे पण वाचा :

Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ही Electric कार; कुठे होतेय विक्री??

Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल इतके मायलेज

Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड