हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टाटा स्टीलने युनायटेड किंगडममधील पोर्ट टॅलबोट येथील ब्लास्ट फर्नेस 4 आणि इतर लोह व स्टील उत्पादनाचा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक लोकांवर परिणाम होणार असून, त्याचाच परिणाम म्हणजे 2,500 कामगारांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन आणि पारंपरिक यंत्रणांमध्ये आणखी गुंतवणूक करणे, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या शक्य नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
नव्या प्रकल्पासाठी करणार गुंतवणूक
या वर्षाच्या सुरुवातीस गहिरा पाण्याचे बंदर, मोर्फा कोक भट्टी, ब्लास्ट फर्नेस 5 आणि कंटिन्युअस कास्टर 2 बंद झाले. तसेच आता सिंटर प्लांट, ब्लास्ट फर्नेस 4 आणि प्राथमिक स्टील उत्पादनासोबत काही द्वितीय स्टील उत्पादन व ऊर्जा यंत्रणा बंद होणार आहे. टाटा स्टीलने लोकांना आश्वासन दिले आहे कि, 2027 किंवा 2028 मध्ये इलेक्ट्रिक आर्क फर्नेसच्या माध्यमातून स्टील उत्पादन पुन्हा सुरू होईल. या नव्या प्रकल्पासाठी 1.25 अब्ज पौंडांच्या गुंतवणुकीची योजना त्यांनी आखली आहे. ज्यामध्ये UK मधील वापरलेल्या स्टील वस्तूंचा पुन्हा वापर केला जाणार आहे. सोबतच CO2 ग्रीन स्टील उत्पादनासाठी 750 दशलक्ष पौंडांची गुंतवणूक होणार आहे. यालाच यूकेच्या सरकारने 500 दशलक्ष पौंडांचे ग्रँट फंडिंग दिले आहे.
गुंतवणुकीमुळे होणार रोजगाराची निर्मिती
टाटा स्टीलने स्थानिक समुदाय, ग्राहक आणि नियोजन विभागासोबत नवीन इलेक्ट्रिक आर्क फर्नेसचा आराखडा तयार करून , तो लोकांपर्यंत पोहचवला जात आहे. त्यामध्ये कंपनी येत्या काही आठवड्यात इलेक्ट्रिक आर्क फर्नेसचे उपकरण बनवणाऱ्याचे नाव जाहीर करणार आहे. टाटा स्टील यूकेचे CEO राजेश नायर यांनी सांगितले की, आजचा दिवस आमच्या व्यवसायाशी जोडलेल्या सर्वांसाठी किती कठीण आहे , याची त्याचा पूर्ण कल्पना आहे. त्यांना विश्वास आहे कि , येत्या काळात गुंतवणुकीद्वारे अधिक नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे स्थानिक समुदायाच्या विकासास गती मिळेल.