हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल हा CNG गाड्यांकडे वळला आहे. याच पार्श्वभूमीवर आता TATA कडून CNG नेक्सॉन आणि मारुती कडून CNG Brezza चे लॉंचिंग करण्याची तयारी सुरू आहे.
टाटा ने यापूर्वीच सीएनजी सेगमेंटमध्ये पाऊल ठेवले असून. टियागो (Tiago) आणि टिगोर (Tigor) ला कंपनीने फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट सोबत लाँच केले आहे. त्यात आता कंपनीची सर्वात पॉप्युलर असलेल्या टाटा नेक्सॉनला CNG किटसोबत बाजारात आणण्याची तयारी टाटा कडून सुरू आहे.
माहितीनुसार, टाटा मोटर्स सणासुदीच्या हंगामात म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 पर्यंत नेक्सॉन सीएनजी बाजारात सादर करेल. Nexon च्या CNG प्रकाराव्यतिरिक्त, कंपनी या SUV च्या इलेक्ट्रिक प्रकारावर देखील काम करत आहे.
दरम्यान, CNG गाड्यांचा वाढता प्रभाव पाहता मारुती देखील आता विटारा ब्रेझा सीएनजी आणण्याची तयारी करीत आहे. यावर्षी दुसऱ्या तिमाहीत लाँच केली जावू शकते. यापूर्वी फक्त मारुती आणि ह्युंदाईची फॅक्ट्री फिटेड सीएनजी सोबत आपले मॉडल्स विक्री करीत होती. मात्र आता टाटा कंपनी यामध्ये उतरल्याने स्पर्धा वाढली आहे.