CNG अन् LPG वाहने महागणार! सरकारचा मोठा निर्णय

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यात निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. अन आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडला असून, यामध्ये विविध क्षेत्रासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये CNG आणि LPG व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी वाहनांवरील करात 1 % ची वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. सध्याच्या घडीला वाहनाच्या प्रकारावरून अन किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कर आकारतात, पण आता या करात 1 टक्क्याने वाढ होणार आहे. यामुळे कार खरेदी करणे महाग होणार आहे. यामुळे राज्याला तब्बल 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या निर्णयानुसार 1 एप्रिलपासून या करात 1 टक्क्याची वाढ लागू होणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने –

याशिवाय, 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6 टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव देखील ठेवला गेला आहे. या प्रकरणी, मोटार वाहन कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपये वरून 30 लाख रुपये केली आहे.

विशिष्ट वाहनांवरील कर –

बांधकाम क्षेत्रातील वाहने जसे की क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर व एक्सकॅव्हेटर यांच्यावर 7 टक्क्यांच्या दराने एकरकमी कर आकारला जाईल. हा कर 1 एप्रिलपासून लागू होईल.

आर्थिक सुधारणांची दिशा –

राज्य सरकारने आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून भांडवली खर्चात वाढ करून विकास चक्रास चालना देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यामुळे राज्याच्या विकास दरात वाढ होईल आणि विविध पायाभूत सुविधांच्या कामामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला उंचीवर नेण्यात मदत होईल.

मुंबई महानगर प्रदेशाची आर्थिक वाढ –

मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 बिलीयन डॉलर वरून 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर, तर 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरीडॉर, भुयारी मार्ग आणि मेट्रो प्रकल्प यामुळे मुंबई क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार आहे.

नवीन औद्योगिक धोरण आणि गुंतवणूक –

‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून राज्याने नवीन औद्योगिक धोरण तयार केले आहे, ज्याद्वारे आगामी पाच वर्षांत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.

आर्थिक वर्षासाठी कर महसूलाचे उद्दिष्ट –

2024-25 आर्थिक वर्षाचे प्रारंभिक कर महसुलाचे उद्दिष्ट – 3 ,43 ,40 कोटी रुपये होते.
2024-25 साठी सुधारित कर महसुलाचा अंदाज – 3,67,467 कोटी रुपये आहे.
2025-26 आर्थिक वर्षासाठी कर महसूलाचे उद्दिष्ट – 3,87,674 कोटी रुपये आहे.