गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावर भरावा लागणार टॅक्स; पहा काय आहेत नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगात सर्वाधिक सोन्याचा वापर आपल्या देशात केला जातो. गुंतवणूक असो वा सौंदर्य, सोने सर्वोपरि आहे. लग्नाच्या एकूण खर्चापैकी सर्वांत मोठा हिस्सा सोन्यावर खर्च होतो. लग्न किंवा नातेवाइकांच्या वाढदिवसानिमित्तही सोने भेट म्हणून दिले जाते. कोरोना महामारीने संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त केली असली तरी लोकांच्या सोन्याच्या वेडावर अजिबात परिणाम झालेला नाही.

भारतात भेटवस्तूंवर कोणताही टॅक्स नसला तरी सोने या कक्षेबाहेर आहे. गिफ्ट केलेले सोने टॅक्सफ्री नसते. एका ठराविक मर्यादेनंतर गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावर टॅक्स भरावा लागतो. डिजिटल गोल्ड, फिजिकल गोल्ड, पेपर गोल्ड, डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट अशा विविध मार्गांनी सोन्यात गुंतवणूक केली जाते. सोन्यातील गुंतवणुकीवर आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही टॅक्स भरावा लागतो.

सोन्याच्या गुंतवणुकीवर गुंतवणुकीवर टॅक्स आकारला जातो
तुम्ही दागिने, बिस्किटे, कॉईन किंवा गोल्ड बार यांसारख्या फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास, त्यावरील टॅक्सचे नियम वेगळे आहेत. सोने खरेदी करताना GST भरावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीने सोने विकले तर त्याला 20 टक्के दराने टॅक्स भरावा लागतो. लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) च्या आधारावर सोन्याच्या विक्रीवर 4% सेस आहे. सोने खरेदी केल्यानंतर, तुम्ही ते 36 महिन्यांच्या आत विकल्यास, ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स STCG अंतर्गत येईल आणि 36 महिन्यांनंतर, सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो.

या प्रकरणात टॅक्स नाही
काही प्रकरणांमध्ये, भेट म्हणून दिलेले सोने पूर्णपणे टॅक्सफ्री असते. कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू म्हणून मिळालेले सोने कराच्या अधीन नाही. वडिलांनी मुलीच्या वाढदिवसाला दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. तसेच गिफ्ट मध्ये मिळालेल्या सोन्याला कोणतीही मर्यादा नाही.

या सोन्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही
लग्नात सोन्याचे दागिने देणे ही परंपरा आहे. आई तिच्या मुलीच्या लग्नात सोन्याचे दागिने भेट देते. मग तीच मुलगी नंतर आपल्या मुलीला सोने भेट देते. भेट म्हणून सोने देण्याची ही प्रक्रिया खूप पुढे जाते. अशा भेटवस्तूंवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही.

कुटुंबातील पुढच्या पिढीला सोने देण्याची परंपराही खूप जुनी आहे. याला इनहेरिटिंग गोल्ड म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सोन्याचा वारसा मिळाला असेल तर त्यावर कोणताही टॅक्स नाही.

जर तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा दूरच्या नातेवाईकाकडून सोने भेट म्हणून मिळाले असेल तर त्यावर टॅक्स भरावा लागेल. या कराची नोंद ‘इनकम फ्रॉम अदर सोर्स’ मध्ये केली जाते. भेट दिलेल्या सोन्याचे मूल्य 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच या सोन्यावर टॅक्स आकारला जाईल.

Leave a Comment