Tax Savigs Scheme | निवृत्तीनंतर आपले जीवन सुखकर जावे. यासाठी अनेक लोक तरुण वयापासूनच गुंतवणूक करत असतात. त्यासाठी अनेक योजना देखील शोधत असतात. जेणेकरून या गुंतवणूकीचा निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगला परतावा मिळाला. तसेच त्यानंतरचे आयुष्य त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जगता येईल.
परंतु ही बचत करत असताना तुमची गुंतवणूक सुरक्षित असते खूप गरजेचे आहे. आता आम्ही तुम्हाला अशा काही सरकारी योजना बद्दल सांगणार आहोत. ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी खूप फायद्याच्या ठरणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेवर तुम्हाला 8 % व्याज देखील मिळणार आहे. तर आता आपण या योजना जाणून घेऊयात.
मुदत ठेव योजना
ही योजना अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 6.9 ते 7.5 टक्के दराने व्याज मिळते. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 80c अंतर्गत कर सवलतीचा (Tax Savigs Scheme) देखील लाभ मिळतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Tax Savigs Scheme
या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केल्यास त्यांना 8.2% पर्यंत व्याजदर मिळतो. त्याचप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तुमचे वय जर 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तरच तुम्ही या गुंतवणुकीमध्ये या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना
सरकारने ही योजना खास मुलींसाठी तयार केलेली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना 8.2% दराने व्याज मिळते. यामध्ये 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते देखील उघडता येते. त्याचप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपासून देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
या प्रमाणपत्रामध्ये ही गुंतवणुकीची परिपक्वता कालावधी 5 वर्षे ते 10 वर्षे दरम्यान असतो. यावर तुम्हाला 7.7 टक्के दराने व्याज मिळते या गुंतवणुकीमध्ये किमान मर्यादा 1000 रुपये आहे. त्याचप्रमाणे कलम 80 c अंतर्गत तुम्हाला कर सूट देखील मिळते.
राष्ट्रीय पेन्शन योजना
राष्ट्रीय पेन्शन योजना ही तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकते. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर याद्वारे पेन्शनचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे कलम 80c अंतर्गत तुम्हाला करांमध्ये सूट देखील मिळते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
गुंतवणुकीसाठी ही योजना एक चांगली योजना आहे. या सरकारी योजनेत तुम्हाला वार्षिक 7.1% व्याज दिले जाते योजनेची खासियत म्हणजे यामध्ये पीपीएफ गुंतवणूक करून तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत कर बचतीचा देखील लाभ घेऊ शकता.