हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving : इन्कम टॅक्स ऍक्ट 80 CC अंतर्गत करदात्यांना 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलती साठी क्लेम करता येतो. हे लक्षात घ्या की, करदात्यांकडे गुंतवणुकीचे असे अनेक पर्याय आहेत ज्याद्वारे त्यांना टॅक्स वाचवू शकतील. मात्र, यामध्ये फारसा रिटर्न मिळत नाही.
अशा परिस्थितीसाठी, आज आपण अशा 4 योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे फक्त टॅक्सच वाचणार नाही तर आपल्याला चांगला रिटर्न देखील मिळेल. चला तर मग या योजनांबद्दल तपशीलवार माहिती घेउयात…
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
हा टॅक्स वाचवण्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे. 15 वर्षांत मॅच्युर होणाऱ्या या योजनेवर सध्या वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 5 वर्षांनंतर पैसे काढता येतील. या योजनेमध्ये आपल्याला किमान 500 रुपये गुंतवावे लागतील. PPF चे गुंतवणूकदार 80 CC अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीसाठी देखील क्लेम करू शकतात. Tax Saving
सुकन्या समृद्धी योजना
10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावाने पालकांना ही योजना सुरु करता येईल. याद्वारे गुंतवणूकदारांना 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्स वाचवता येईल. सध्या या योजनेवर सरकाकडून 7.60 टक्के व्याज दिले जात आहे. इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या योजनेमध्ये फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येऊ शकेल. मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा ती 10 वी पास असेल तर 50 टक्क्यांपर्यंत डिपॉझिट्सची रक्कम काढता येईल. मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी हे खाते मॅच्युर होईल आणि ज्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येईल. या खात्यात मिळणारे व्याज हे टॅक्स फ्री आहे. Tax Saving
बँक फिक्स्ड डिपॉझिट
बँकेच्या FD द्वारेही टॅक्स वाचवता येईल. हे चांगल्या रिटर्नची गॅरेंटी देते. यामुळेच गुंतवणूकदार बँक एफडीमध्ये भरपूर पैसे गुंतवतात. हे लक्षात असू द्यात कि वेगवेगळ्या बँका एफडीवर वेगवेगळे व्याजदर देतात. त्याच वेळी, सह एफडी गुंतवणूकदार वरील योजनांप्रमाणे कर सवलतीचा क्लेम करू शकतात. बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर अतिरिक्त व्याज दिले जाते. 5 वर्षांची बँक एफडी सर्वोत्तम मानली जाते. Tax Saving
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
या द्वारे देखील देखील आपल्याला टॅक्स वाचवता येईल मात्र हे फक्त 60 वर्षांवरील लोकांनाच ही योजना सुरु करता येईल. 1000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे याची सुरुवात करता येईल. सरकारकडून सध्या या योजनेवर 7.4 दराने व्याज दिले जात आहे. मात्र यामधील व्याजाची रक्कम 1 वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाईल. याशिवाय गुंतवणूकदारांना या योजनेतून वेळेआधी पैसे काढायचे असतील तर त्यांना दंड भरावा लागेल. Tax Saving
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/
हे पण वाचा :
SIP मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा कोट्यवधी रुपये !!!
Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!
मास्क्ड Aadhar Card म्हणजे काय ??? अशाप्रकारे करा डाउनलोड
Stock Market : IT शेअर्समध्ये गुंतवणूक करताय… जरा थांबा !!! तज्ञ काय म्हणतात ते पहा
Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!