सावधान! आयकर विभागाच्या ई-मेलवर दुर्लक्ष करणे पडेल महागात; दिला ‘हा’ इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना महामारीमध्ये आयकर विभागाने (Income Tax Department) वेळीवेळी करदात्यांना (Taxpayers) ई-मेलद्वारे सूचना केल्या. जेणेकरुन करदात्यांना प्रत्येक महत्त्वाचा मेसेज मिळावा. पण तरीदेखील अनेक करदाते मेले चेक करत नसल्यामुळे त्यांनी पुढे अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयकर विभागाने एक ट्वीट करून आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका असं करदात्यांना सूचित केलं आहे.

आम्ही पाठवलेले प्रत्येक ई-मेल हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं असता तुम्हाला नुकसान होऊ शकतं असं आयकर विभागानं ट्वीटद्वारे म्हटलं आहे. अधिक माहितीनुसार, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केल्याचं म्हटलं आहे.

IT विभागाचे अधिकृत आयडी
दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे अनेक लोक ई-मेल मिळाल्यानंतरही त्यावर उत्तर देत नाही आहेत. यासाठी आयकर विभागाकडून काही अधिकृत ई-मेलची यादी जारी करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला खरंच आयकर विभागाचा मेल आला आहे की फसवणुकीचा आहे हे शोधणं सोपं जाईल. यासाठी आयकर विभागाने खालीलप्रमाणे अधिकृत ई-मेल आयडीची यादी जाहीर केली आहे.
– @incometax.gov.in
– @incometaxindiaefiling.gov.in
– @tdscpc.gov.in
– @cpc.gov.in
– @insight.gov.in
– @nsdl.co.in
– @utiitsl.com

या ई-मेल आयडीद्वारे जर तुम्हाला मेल आला तरच त्यावर उत्तर द्या असं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. तर हा ई-मेल पाठवणाऱ्या विभागांचे सेंडर आयडी खालीलप्रमाणे दिले आहेत. (taxpayers if you got income tax department email do not ignore it)
– ITDEPT
– ITDEFL
– TDSCPC
– CMCPCI
– INSIGT
– SBICMP
– NSDLTN
– NSDLDP
– UTIPAN

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment