हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील टॉपची IT कंपनी असलेल्या टाटा कंसल्टेंसी सर्विसेजने (TCS) यंदा तब्बल 10,000 हुन अधिक फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली आहे. देशातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून या सर्व फ्रेशर्सची भरती करण्यात आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार,या आर्थिक वर्षात मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने आयटी कंपनीने नोकरीत वाढ केल्याचे बोलले जात आहे. कंपनीने नॅशनल क्वालिफायर टेस्ट (NQT) द्वारे ही भरती केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 10 एप्रिल होता.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने जाहीर केलेल्या टेस्ट 26 एप्रिल रोजी होणार आहेत. कंपनी एकूण तीन कॅटेगरी साठी नोकिरीचे प्रमाणपत्र देत आहे, ज्यामध्ये निन्जा डिजिटल प्राइम प्राईम श्रेणीचा समावेश आहे. यातील निन्जा कॅटेगरी मधील कर्मचाऱ्याला वार्षिक ₹3.36 लाखांचे पॅकेज मिळेल, डिजिटल कॅटेगरी मधील कर्मचाऱ्याला वार्षिक 7 लाखांचे पॅकेज आणि प्राइम श्रेणीतील कर्मचाऱ्याला वार्षिक 9 ते 11.5 लाख रुपयांचे पॅकेज देण्यात येत आहे. डिजिटल आणि प्राइम प्रोफाइल प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना डेव्हलपमेन्टच्या भूमिकेसाठी ठेवण्यात येईल तर निन्जा प्रोफाइलमधील विद्यार्थ्यांना सपोर्टिव्ह भूमिकेत ठेवले जाईल.
“माझ्या मते, सध्याची परिस्थिती लक्षात घेता ही एक अतिशय स्वागतार्ह वाटचाल आहे, त्यामुळे निश्चितच सर्व महाविद्यालयांतील चांगल्या विद्यार्थ्यांना टीसीएसमध्ये प्लेसमेंट मिळेल. मला वाटते की त्यांची संख्या चांगली असेल. आम्हाला सुद्धा तेच अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक व्ही सॅम्युअल राजकुमार यांनी दिली. यापूर्वी टीसीएसने 2024 च्या आर्थिक वर्षात 40,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी देण्याची आपली योजना असल्याचे सांगितले होते. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 22,600 कर्मचाऱ्यांना नोकरी दिली होती.