हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन TCS Layoffs 2025 । देशातील आणि जगातील आघाडीची IT कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS ) ने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. यावर्षी तब्बल १२,२६१ कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे टीसीएसने या वर्षी एप्रिल-जून तिमाहीत ५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती देखील केली होती. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबावर मोठा परिणाम होणार आहे. IT क्षेत्रांत मागच्या काही वर्षांपासून मुलांहूचा इंटरेस्ट वाढला आहे. परंतु TCS सारख्या आघाडीच्या कंपनीनेच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याषचा निर्णय घेतल्याने IT मध्ये मोठा उलटफेर तर होणार नाही ना? या चर्चाना बळ मिळताना दिसतंय.
का घेतला निर्णय? TCS Layoffs 2025
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, भविष्यासाठी तयार संघटना एक लांबचा विचार आणि दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून सध्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला हं. या माध्यामातून कंपनी आपली गुंतवणूक नवनवीन तंत्रज्ञानात करत आहे. खास करून AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स मध्ये कंपनी जास्त फोकस करेल. कंपनी नव्या जागतिक बाजारात प्रवेश करण्यावर भर देत आहे. नवीन तंत्रज्ञान आणि एआयचा अवलंब करून आम्ही स्वतःला आणि आमच्या क्लायंटना भविष्यासाठी तयार करत आहोत. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून काही कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले जाईल (TCS Layoffs 2025) ज्यांना पुन्हा नियुक्त करण्याची शक्यता नाही असं TCS ने आपल्या निवेदनात म्हंटल आहे.
टीसीएसच्या कपातीच्या (TCS Layoffs 2025) निर्णयाचा परिणाम ही कंपनी जिथे काम करते त्या सर्व देश आणि प्रदेशांमधील कर्मचाऱ्यांवर होईल. ही प्रक्रिया २०२६ च्या आर्थिक वर्षापर्यंत (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) लागू असेल. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६,१३,००० होती. त्यामुळे जरी कंपनीने २ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली तरी तब्बल १२,२०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल. टीसीएसकडून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा लाभ आणि आउटप्लेसमेंट संधींव्यतिरिक्त नोटिस कालावधीचा पगार आणि अतिरिक्त सेव्हरन्स पॅकेजसाठी विचारात घेतले जाईल असं बोललं जातंय.
इतका कंपन्यांही देतायत कर्मचाऱ्यांना दणका –
दरम्यान, फक्त TCS च नव्हे तर या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये आतापर्यंत १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७% आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव, आर्थिक मंदीची भीती यामुळे भविष्यात इतर IT कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.



