TCS Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता देशातील सर्वात मोठ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत मोठी भरती निघालेली आहे. ही भरती TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS Recruitment 2024) या कंपनीत निघालेली आहे. ही सगळ्यात मोठी आयटी कंपनी आहे आणि इथे फ्रेशर्ससाठी आता एक बंपर भरती निघालेली आहे. कंपनीने 2024 मध्ये B. Tech, BE, MCA, आणि MS झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या पदांसाठी कंपनी किती जागा भरणार आहे, हे अजून जाहीर केलेले नाही. परंतु मागील वर्षी त्यांनी 40 हजार जागा भरल्या होत्या. त्यामुळे यावर्षी देखील 40,000 जागा भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गटानुसार पॅकेज
TCS कंपनीकडून या भरतीसाठी तीन गट तयार केलेले आहे. यामध्ये निंजा, डिजिटल आणि प्राईम हे गट आहेत निंजामध्ये 3.36 लाखाचं पॅकेज आहे. या डिजिटल प्रकारात 7 लाख रुपये आणि प्राईम गटात 9 लाख ते 11 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी लेखी परीक्षा देणे खूप गरजेचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख | TCS Recruitment 2024
TCS मधील या नोकर भरतीसाठी तुम्हाला 10 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 26 एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे. TCS कंपनीने जानेवारीमध्ये सांगितले होते की, 2024-25 साठी फ्रेशर्सची भरती होणार आहे. त्यामुळे कंपन्या सध्या अनेक महाविद्यालयांना भेट देत आहेत.
त्यांनी बिझनेस प्रोसेसिंग स्पेशालिस्टसाठी देखील रिक्त जागा काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे कंपनी कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीधरांना संधी देणार आहे. या पदवीधरांना बिजनेस प्रोसेसिंग स्पेशालिस्ट म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
TCS मधील कर्मचाऱ्यांची संख्या
TCS मधील कर्मचाऱ्यांची संख्या आहे 10, 669 वरून 6.3 लाखवर आलेली आहे. टीसीएसचे एचआर मिलिंद लक्कड यांनी डिसेंबरमध्ये सांगितले होते की, आम्ही पुढील वर्षासाठी कॅम्पस भरती सुरू करणार आहे.