हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलगू देसम पार्टीचे संस्थापक नंदामुरी तारका रामाराव यांची धाकटी कन्या कंथामेनी उमा माहेश्वरी (Uma Bharti) यांनी आत्महत्या रविवारी रात्री आत्महत्या केली आहे. हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. उमा महेश्वरी (Uma Bharti) या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वहिनी होत्या.
हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. उमा महेश्वरी (Uma Bharti) या आजारपणामुळे डिप्रेशनमध्ये होत्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उमा माहेश्वरी (Uma Bharti) या एनटी रामाराव यांच्या चौथ्या कन्या होत्या.
कोण आहेत एनटी रामाराव ?
एनटी रामाराव यांनी त्यांच्या कारकिर्दीत कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले. यानंतर त्यांनी राजकारणात नशीब आजमावले. त्यांनी राजकारणात प्रवेश करताच टीडीपी पक्षाची स्थापना केली. एनटी रामाराव हे फिल्म इंडस्ट्रीत दीर्घकाळ कार्यरत तेलगू अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 1982 मध्ये पक्षाची स्थापना केली. त्यांच्या या पक्षाने यश मिळवत आंध्र प्रदेशात सत्ता मिळवली आणि एनटी रामाराव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. यानंतर काही काळाने एनटी रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी पक्षात बंडखोरी करून मुख्यमंत्रिपदासह पक्ष काबीज केला. यानंतर काही दिवसांनी एनटी रामाराव यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर