परळीत कोरोनाच्या कोरोनामुळे शिक्षकाचा मृत्यू; शिक्षक वर्गात खळबळ

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परळी प्रतिनिधी | बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात कोरोना संसर्गजन्य रोगाने सर्वत्र पाय पसरले आहेत. आता सिरसाळा येथील जि.प. उर्दू शाळेच्या एका शिक्षकाचा कोरोना अजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेख जब्बार (वय ४२) वर्ष यांचा १३ जुलै रोजी कोरोना अहवाल पोझिटिव्ह आढळून आला होता. त्यांच्या मृत्यूने आता शिक्षक वर्गार एकच खळबळ उडाली आहे.

सदर मृत शिक्षक सिरसाळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत उपशिक्षक म्हणुन काम पाहतात. शेख जब्बार असे त्यांचे नाव असून ते पेठ मोहल्ला, परळी येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्यावर कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रथम अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच दुपारी ३ वा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परळी शहरात विशेषतः शिक्षक वर्गामध्ये एकाच खळबळ उडाली आहे.

दरम्यान जब्बार यांचा कोरोना रोगाने मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असून परळी तालुक्यात हा दुसरा मृत्यू आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी सावधानता बाळगावी व शासनाचे नियम पाळावे. यापूर्वीच एका महिलेचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला होता. सदर महिला हि कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर प्रथम अंबाजोगाई आणि नंतर औरंगाबाद येथील एम जी एम रुग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here