“गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ (Video Viral) पाहत असतो. या व्हिडिओ (Video Viral) काही जण रातोरात स्टार झालेले आपण पहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर शाळेतील शिक्षकांचा एक व्हिडिओ (Video Viral) जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Video Viral) एक शिक्षिका त्यांच्या सुंदर आवाजात “छडी नका मारू – गुरुजी लागतंय हातावरी हे गाणे गाताना दिसत आहे. त्यानंतर त्यांच्या मागे बाकीचे शिक्षक गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
अन भाऊजी… हात नका लाऊजी, पाहिल कुणीतरी… ही लावणी किंवा गाणे आपण सगळ्यांनी ऐकले असेलच. मात्र या गाण्याच्या चालीवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा ध्यास काही शिक्षक मंडळींनी घेतला आहे. “अहो गुरुजी… छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, असे म्हणत विद्यार्थ्यांमध्ये एका वेगळ्याच पध्दतीने प्रबोधन केले जाणार आहे. आणि त्याच्याच सरावाचा हा व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/100007276878866/videos/1729064607441202/

विद्यार्थ्यांचे वेगळ्या प्रकारे प्रबोधन
एका शाळेच्या वर्गातील हा व्हिडीओ (Video Viral) आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुले नसून खुप सारे शिक्षक दिसत आहेत. या व्हिडीओत मात्र शिक्षिका बाकीच्या शिक्षकांना शिकवत आहे. खरं पाहिलं तर प्रत्येक शाळेची, शिक्षकांची शिकवण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही शिक्षक तर इतक्या वेगळ्या पद्धतीने शिकवतात ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. अशाच शिक्षकांपैकी हा एक शिक्षक मंडळींचा ग्रुप आहे, जो आपल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे शिकवून त्यांचे प्रबोधन करत आहे. त्यांच्या शिकवण्याच्या या हटके शैलीमुळे हा शिक्षकांचा ग्रुप मोठ्या प्रमाणात फेमस झाला आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment