हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत- पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येतेय. आगामी आशिया कप स्पर्धेतून टीम इंडिया आपलं नाव मागे घेणार आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपला निर्णय जवळपास निश्चित केला असल्याचं बोललं जातंय. बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) आपल्या निर्णयाची माहितीही एका रिपोर्ट मधून समोर आली आहे. पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी हे ACC चे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत उतरणे बीसीसीसीआयला मान्य नाही, त्यामुळेच यंदाच्या आशिया कप मध्ये टीम इंडिया खेळणार नाही असं बोललं जातंय.
याबाबत बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ज्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पाकिस्तानचे मंत्री आहेत त्या आशिया कप मध्ये आम्ही खेळू शकत नाही. हीच आमच्या देशाची भावना आहे. त्यामुळे आगामी महिला इमर्जिंग टीम्स आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कपमधून टीम इंडिया निश्चितच बाहेर पडेल. भारताच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे, कारण पाकिस्तानला क्रिकेट विश्वात एकटं पाडण्यासाठीच बीसीसीआयने आशिया कपवर बहिष्कार घातला असल्याचं बोललं जातंय. त्याच कारणही अगदी तसेच आहे.
🚨 INDIA OPTS OUT FROM ASIA CUP. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2025
– The BCCI decides to not participate in the upcoming Asia Cup. (Express Sports). pic.twitter.com/DARU2lameb
सध्याच्या जागतिक क्रिकेट मध्ये बीसीसीआय बादशाह आहे. जगात भारतीय क्रिकेटचा डंका आहे. बीसीसीआय हि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असल्याने भारताला क्रिकेट विश्वात मोठा मान सन्मान आहे. आशिया मध्येही भारतीय क्रिकेटला मोठा वजन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अनेक प्रायोजक भारतातील आहेत. त्यामुळे बीसीसीआयला सुद्धा माहिती आहे कि, भारताशिवाय आशिया कपचे आयोजन शक्य नाही. जर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामनाच होणार नसेल तर आशिया कपमध्ये कोणतीही उत्कंठा राहणार नाही. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ पुरुष क्रिकेट आशिया कपमध्ये खेळतात. मात्र या स्पर्धेत भारताचाच बोलबाला आत्तापर्यंत बघायला मिळाला आहे.




