सोशल मीडिया आणि आजची तरुणाई..

सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे … Read more

अन्यथा सेवा बंद करू! पाकिस्तानला फेसबुक, ट्विटर, गुगलचा कडक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. या नवीन नियमामुळे फेसबुक, ट्विटर आणि गुगलनं या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये आपली सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. पाकिस्तान सरकारने हे नवीन नियम मागे घ्यावे अशा मागणीचे पत्र ‘एशिया इंटरनेट कॉलिशन’तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान दिले गेले आहे. मात्र, सदर नियमांमध्ये बदल … Read more

आता दस्तऐवज जमा न करता काही मिनिटांत मिळवा पॅन, तेही विनामूल्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅनकार्डसाठी तुम्हाला आता कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाने त्वरित पॅन मिळविण्यासाठी ई-पॅन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत अर्जदारांना पॅन पीडीएफ स्वरुपात दिले जाईल, जे अगदी विनामूल्य असेल. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ई-पॅन किंवा इन्स्टंट पॅनसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे वैध आधारकार्ड असायला हवं तसेच आपला मोबाइल नंबर आधारशी जोडलेला असावा. … Read more

हैद्राबादमधील अभियंत्यांचा इको फ्रेंडली उपक्रम; गाडी सफाईसाठी तयार केलं वाफेवर चालणारं यंत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाडी धुण्यासाठी किमान १० ते १५ लीटर पाणी लागतं हे आपल्याला माहिती आहे. पण गाडी धुण्यासाठी इको फ्रेंडली पद्धती अवलंबल्याचं तुम्ही कधी ऐकलंय किंवा पाहिलंय का? हैद्राबादमध्ये राहणाऱ्या दोन अभियंत्यांनी वाफेवर चालणारं गाडी धुलाई यंत्र शोधून काढलं आहे. व्ही.मनिकांत रेड्डी आणि त्याच्या मित्राने पाण्याची बचत करणारं हे यंत्र शोधून काढलं असून … Read more

वणव्याची माहिती आता वन अधिकाऱ्यांना मिळणार मोबाइलवर; नासा करणार मदत

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची तात्काळ माहिती आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. त्याअनुषंगाने नासाच्या संकेतस्थळावर अमरावती विभागात आतापर्यंत ७५ टक्के वनकर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांनी जानेवारीमध्ये विभागीय वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनवणवा नियंत्रणाबाबत सूचना केल्या. या बैठकीत … Read more

संशोधन समाजासोबत जोडता यायला हवं – गणपती रामनाथ; ‘वायसी’मध्ये भौतिकशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उदघाटन

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे फिजिक्स विभागाने आयोजित केलेल्या तीन दिवशीय “मल्टी फंक्शनल अँड हायब्रीड मटेरियल फॉर एनर्जी अँड एन्व्हायरमेन्ट” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन शास्त्रज्ञ प्रोफेसर गणपती रामनाथ यांच्या हस्ते झाले.

तंत्रज्ञानासोबत विज्ञानाचाही स्वीकार गरजेचा – माजी कुलगुरू पंडित विद्यासागर

येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि महाराष्ट्र केडेमी ऑफ सायन्सेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक पंडित विद्यासागर माजी कुलगुरू स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे व्याख्यान आज दि २९ जानेवारी २०२० रोजी कर्मवीर सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

TATAने केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV कार लाँच; इतकी असणार किंमत

TATA मोटर्सने नॅनोच्या रूपात देशातील सर्वात स्वस्त कार बनवून सर्वसामान्यांचे कारचे स्वप्न केले. त्यानंतर आता भविष्यातील गरज ओळखून देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV देण्याचा दावा TATA ने केला आहे. TATA मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV) ही कॉम्पॅक्ट SUV श्रेणीतील नवी कार मंगळवारी लाँच केली. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली SUV कार आहे. याशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV असल्याचा दावा TATA मोटर्सने केला.

३१ जानेवारीपासून तुम्हाला ‘हे’ अ‍ॅप वापरता येणार नाही

मायक्रोसॉफ्टने अलीकडेच त्याच्या विंडोज 7 बंद केले आहे. दरम्यान, आता कंपनीने आणखी एक सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टने याची पुष्टी केली आहे. मायक्रोसॉफ्ट अँड्रॉइड(microsoft android) आणि आयओएससाठी (ios) व्हर्च्युअल असिस्टंट कोर्टेना (virtual assistant cortana) बंद करीत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीपासून अँड्रॉइड लाँचरवरून कोर्टेना (microsoft launcher app) अप काढून टाकण्यात येणार आहे. हे अ‍ॅप केवळ अमिरिके मध्येच वापरता येणार असे कंपनीने म्हटलं आहे.

एसबीआय ग्राहकांसाठी खास सुविधा, आता डेबिट कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही!

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी व्हर्च्युअल कार्ड (एसबीआय व्हर्च्युअल कार्ड) सुविधा आणली आहे. ग्राहकांना यापुढे ऑनलाइन खरेदीसाठी प्लास्टिक कार्डची आवश्यकता भासणार नाही. ग्राहकांकडे व्हर्च्युअल कार्ड असल्यामुळे हे कार्ड गमावण्याची त्यांना भीती वाटणार नाही. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक कार्डची सर्व वैशिष्ट्ये यात उपलब्ध असतील.